वैराग (महेश पन्‍हाळे) :- कोणत्याही क्षेत्राचा विकास साधण्यासाठी दळणवळण विकसित असणे महत्वाचे असते. बार्शी तालुक्याबाबतीतमध्ये मात्र हे अजिबात दिसून येत नाही. वाड्यावस्त्याच्या ग्रामीण रस्त्यापासून मोठमोठय़ा शहरासह राज्याना जोडणारे राज्यमार्ग देखील खराब झाल्याने दळणवळण संथ झाले आहे. परिणामी तालुक्याचा विकासही मंदावला आहे. याचा सर्वांधिक फटका मानवी आरोग्याला बसत असला तरी काही व्यवसाय मात्र चांगलेच तेजीत आहेत.
       तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जीवनवाहिनीचे काम रस्ते करीत असतात. जर रस्तेच खराब असतील तर केला तेच काम वेळेवर होत नाही. याउलट अपघात घडून नुकसानच अधिक होते. या खराब रस्त्याचे दारिद्रय़ बाश्री तालुक्याला अनेक वर्षापासून लागले आहे. कोणताही एक पूर्ण रस्ता एकही खड्डा नाही पण चांगला आहे, असा रस्ताच नाही. काही रस्ते आहेत. कुठे एक किलोमीटर तर कुठे दोन- तीन किलोमीटर टप्प्याटप्प्यांनी झालेले आहेत. खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाच्या सरकारी गाड्यांनी तर काही मार्गावरुन वाहतूक करणेच बंद केले आहे. काही मार्गावरच्या फेर्‍या कमी केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण जनता खाजगी वाहनातून प्रवास करीत आहे. पण खाजगी वाहनांची अवस्थाही कामापुरतीच असल्याने खराब रस्त्यामुळे प्रवास कधी सुखात दु:खात बदलेल हे सांगता येत नाही. बाश्री शहर वैद्यकीयदृष्ट्या प्रगत असल्याने ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातून अनेक लोक उपचारासाठी शहरात येतात. मात्र या खराब रस्त्यामुळे नेहमीच त्यांच्यासमोरील अडचणीमध्ये वाढ झालेली दिसून येते. शासन एका बाजूने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देवून जलद उपचारासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना दुसर्‍या बाजूने रुग्णवाहिका धावणारे रस्तेच चांगले नसल्याने जलद काम वेळेवर उपचार होणेच अवघड होवून बसले आहे. तालुक्याची कृषी प्रगतीही होत असताना विविध पिकांचे भरलेली वाहने असो वा ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्यांची वाहतूक होणारी ऊस वाहतूक असो, वाहनांची मोडतोड मोठय़ा प्रमाणावर होते. त्यात ताजी भाजी नाशवंत माल असला तर वेळेचे बंधन असते, तो खराब रस्त्यामुळे वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. खराब रस्ते केवळ डागडुजी करण्यावरच लाखो रुपये खर्च होत आहेत. वर्षानुवर्षे तेच ते कार्यक्रम राबवून रस्त्यांवरच करोडो रुपये आजही रस्त्यावरच खर्च होत आहेत. विशेष म्हणजे यानंतरही रस्ते खराबच आहेत. 
        बार्शी तालुक्यामध्ये १३८ गावांना जोडण्यासाठी ग्रामीण मार्ग सुमारे ७00 किलोमीटर पर्यंत तालुक्यात पसरले आहेत. तर इतर जिल्हा मार्ग सुमारे तीनशे किलोमीटर अंतराचे आहेत. अशा एकंदरीत एक हजार किलोमीटरच्या मार्गावरती नियंत्रण जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बाश्री यांचे आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. आणि हेच रस्ते खर्‍या अर्थाने ग्रामीण जीवनाचे खरे साथीदार आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग मिळून सुमारे ३१७ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. यामध्ये सोलापूर, कुडरुवाडी, उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा यासारख्या मार्गाचा समावेश आहे. हे रस्ते मोठे असले तरी दज्रेदार असल्याचे दिसून येत नाहीत. कुठे खचलेले तर कुठे उखडलेले दिसतात. नव्याने तयार होण्यापेक्षा दुरुस्ती करण्याचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. खराब रस्त्यामुळे नागरिकांना पाठीचा त्रास होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असून वाहनांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा फायदा मात्र वाहनदुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, शरीर दुरुस्ती करणार्‍या विविध व्यवसायांचा चांगलाच फायदा होत आहे. खराब रस्ते चालू स्थितीमध्ये अडचणी व भविष्याची प्रगती रोखत असल्याने बाश्री तालुका मागे पडत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या स्थितीमध्ये दज्रेदार सुधारणा होणे काळाची गरज बनली आहे.
    
        बार्शी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती खराब आहे. मात्र एकाचवेळी सगळे रस्ते होणे शक्य नाही. तालुक्याचे आमदार व जिल्हापरिषद मिळून जास्तीतजास्त निधीची उपलब्धता करुन ते दज्रेदार बनवण्याचा प्रय▪करु.
- मकरंद निंबाळकर, आरोग्य व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद सोलापूर.

         खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पाठदुखी, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते खराब असल्याने कामे कोणतीच जलद होत नाहीत. परिणामी खर्च अधिक, पण फायदा कमी अशी स्थिती आहे.   - सतीश गाटे, ग्रामस्थ.
 
Top