पांगरी :- पांगरी (ता.बार्शी) पोलिस ठाणे हद्दीतील चोर्‍याचे सुरू झालेले सत्र कांही केल्या थांबण्यास तयार नसून शुक्रवार दि. 26 शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला मोर्चा कारी गावावर ओळवून गावातील मोबाइल शॉपी,पान स्टॉल,इलेक्ट्रिक वर्क्स,व रिवाईडिंग आदि वेगवेगळी तिन दुकाने फोडून हजारो रुपयांचा माल चोरून नेला.पांगरी जवळील गोरमाळे गावात एकाच रात्रीत दोन घरे फोडून सोन्याचे दागिने व इतर साहिती चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा रात्री कारी गावातील दुकाने फोडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बंद असलेली रात्रगस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे॰
      शशिकांत अर्जुन माळी वय 40 रा.कारी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे कारी गावात भर रस्त्यावर श्री दत्त मोटार रिवाईडिंग वर्क्स या नावाने दुकान असून ते रात्री एक वाजेपर्यंत दुकानात मोटारी भरण्याचे काम करून घरी झोपण्यासाठी गेले असता तेथेच दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी ते घरी गेल्याची संधि साधून दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील पन्नास कि.लो.ग्रॅम तांब्याची तार इतर दुकातील साहित्य चोरून नेले.ते आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. तसेच चोरट्यांनी नंतर शेजारीच असलेल्या उमेश अंकुश मुळे यांच्या मालकीच्या यशराज पान अँड मोबाइल शॉपीकडे आपला मोर्चा वळवून कुलूप तोडून आतमधील विविध कंपन्यांचे सात मोबाइल,रोख साडेचार हजार रुपये असा ऐवज चोरून नेला.
      तिसर्‍या घटनेत गावातीलच गोरोबा रंगनाथ गादेकर वय 50 यांच्या मालकीच्या दत्त इलेक्ट्रिकल्स व मोटार रिवाईडिंग या दुकानाकडे जावून दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून दुकानात प्रवेश करून मोटारी भरण्यासाठी आवश्यक असलेली तांब्याची तार व बंडल चोरट्यांनी लंपास केले.एकाच रात्री तिन ठिकाणी दुकान फोडया झाल्यामुळे व हजारो रुपयाचा माल चोरून नेल्यामुळे दुकाचालकासह जनतेंधून भयभीत वातावरण दिसून येत आहे.वाढत्या चोरया थांबवण्याचे पांगरी पोलीसासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तपास हवालदार शेटे हे करत आहेत.
 
Top