पुणे -: या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्‍हा वाढला. काही शहरांचे किमान तापमान वेगाने घसरले. नागपुरमध्‍ये सर्वांत कमी 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
त्‍यापाठोपाठ नाशिकमध्‍ये 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. देशाच्‍या उत्‍तरेकडील राज्‍यांमध्‍ये थंडीची लाट आली आहे. तेथून बोचरे वारे राज्‍यात तेगाने वाहत असल्‍याने पुन्‍हा पारा घसरू लागला आहे.
     नागपुरचे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्‍बल 5.6 अंश सेल्सिअसने झाले होते. विदर्भाचे तापमान आज सर्वांत जास्‍त घटले होते. पुढील 48 तासांत राज्‍याच्‍या तापमानात आणखी घट होण्‍याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 
    किमान तापमान : जळगाव 10, कोल्‍हापुर 15.4, महाबळेश्र्वर 10.6, मालेगाव 9, सांगली 14.5 सातारा 13.4, सोलापुर 13, मुंबई 21.6, अलिबाग 17.6,रत्‍नागिरी 18.9, डहाणू 17.1, उस्‍मानाबाद 9.9, औरंगाबाद 11.4,
परभणी 10.2, नांदेड 10, अकोला 8.6, अमरावती 12.2, चंद्रपूर 11, यवतमाळ 10.4 

सौजन्‍य ः लोकमत
 
Top