बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) वाडरी रस्त्यावरील ऋतु हॉटेल अॅन्‍ड लॉजवर तपासणी दरम्यान सात अनैतिक संबंध ठेवणार्‍या जोडप्यांना बार्शी पोलिसांनी रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने सदरची मोहिम राबविली.
   मागील अनेक दिवसांपासून सदरच्या लॉजवर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असल्याची चर्चा शहरात सुरु होती. अनेक दिवसांपासून पोलिसांच्या तपासणीत कोणी रंगेहात सापडले नाही. रविवारी २८ रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली यावेळी बाहेरगावच्या अनेक महिला व पुरुष आढळून आले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे त्यांच्या संबंधांचा कसलाही पुरावा त्यांना देता आला नाही. सदरच्या महीलांपैकी काही चांगले शिक्षण घेतलेल्या व इतरांना शिकविणार्‍या असल्याची चर्चा शहरात सुरु होती. सदरच्या लॉज व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.

 
Top