वैराग (महेश पन्हाळे) :- विविध क्षेत्रामध्ये कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणार्‍या महाराष्ट्राला अनिश्‍चित पावसामुळे व घटत्या प्रमाणामुळे सतत टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कृषीक्षेत्राला बसत असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही गंभर बनला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनाच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हय़ात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शासनासोबत लोकसहभागाची गरज असून टंचाई निवारण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
          राज्यामध्ये गेल्या चार दशकापासून कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये चढ-उतार आढळून येत आहे. या परिस्थितीला कमी पाणी हेच कारण असून शेती व पिण्यासाठी शाश्‍वत पाणी उपलब्ध करुन ठेवणे काळाची गरज बनली आहे. याकरिता जलसंधारणांतर्गत एकात्मिक पध्दतीने उपायोजना करण्याचा नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासन गंभीर बनले असून जलयुक्त शिवार अभियानाद्वारे ठिकठिकाणी उपायोजना करण्यासाइी हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याता जवळजवळ ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू व ५२ टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. यावर्षी अपुर्‍या पावसामुळे भूजल पातळीमध्ये २ मीटरपेक्षा जास्त घट २२३४ गावांमध्ये झाली असून यामुळे १८८ तालुके बाधित झाले आहेत. तर शासनाने २२ जिल्हय़ातील १९0५९ गावामध्ये टंचाईची परिस्थिती जाहीर केली आहे .त्यामुळे प्राधान्य क्रमाने या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान राबविणे आवश्यक आहे. याकरिता सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २00९ या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. 
         या अभियानांतर्गत पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात गावच्या शिवारामध्येच अडविण्यात येणार आहे. याशिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्राच्या वाढीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, राज्यातील सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याची शाश्‍वतता, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनजिर्विकरण करुन पाणी पुरवठय़ामध्ये वाढ करणे, भूजल अधिनियमची अंमलबजावणी करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करावे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेली पण निकामी झालेल्या जलस्त्रोतांची (बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे) पाणी साठवण क्षमता पुनस्र्थापित करणे, अस्तित्वातील जलस्त्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढवणे, वृक्ष लागवड, पाणी ताळेबंदाची जागृती करणे, पाणी अडविणे, जिरवणे याबाबत प्रोत्साहित करुन लोकसहभाग वाढवणे आदी महत्त्वपूर्ण उद्देश या जलयुक्त शिवार अभियानाचे आहेत. शासकीय स्तरावरुन पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. या शासकीय प्रयत्नांना लोकांनी सहभागी होऊन साथ दिली तर पाणी आडविण्याची व जिरविण्याची कामे दज्रेदार तसेच गतीने होतील. याशिवाय जनतेच्या प्रत्यक्ष सहभागामुळे त्याच्यात मौल्यवान पाण्यासंबंधीची जाणीवही निर्माण होईल. या जलयुक्त शिवार अभियानाची नितांत गरज सोलापूर जिल्हय़ाला असून विषम भौगोलिक परिस्थितीमुळे नेहमीच इतर जिल्हय़ात पडणार्‍या पावसावर विसंबून रहावे लागत आहे.

राज्यातील उपलब्ध पाणीसाठा
मोठे प्रकल्प  ८१ टक्के
मध्यम प्रकल्प ६७ टक्के
लघु प्रकल्प  ६0 टक्के

 
Top