बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) कृषि उत्पन्न बाजार समिती समोर शेतकर्‍यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास जिल्हा उपनिबंधक बी.टी. लावंड, सहाय्यक उपनिबंधक यू.यू.पवार
       कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यापार करणार्‍या हारुण अल्लाबक्ष केमकर (बागवान), हरिफ हारुण केमकर (बागवान) यांनी शेतकर्‍यांच्या शेतामध्ये येऊन कांद्याचा सौदा केला, माल ताब्यात घेऊन परस्पर विल्हेवाट लावली व पैसे देण्यास अनेक महिने टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांनी इशारा देऊन २० पासून आमरण उपोषण सुरु केले होते.  बाजार समितीने दिलेल्या लेखी पत्रामध्ये ज्या शेतकर्‍यांची फसवणूक झाली त्यांच्यासाठी १५ दिवसांत बैठक बोलाविण्यात येईल, संबंधीत व्यापार्‍यांशी चर्चा करुन बाजार समिती मध्यस्तीची भूमिका पार पाडून तोडगा काढेल, तूर्तास ज्यांची तक्रार आहे त्या व्यापार्‍यांचे व्यवहार बंद करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
यांनी भेट दिल्यानंतर बाजारसमितीने लेखी आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांचे आंदोलन रात्री उशीराने मागे घेण्यात आले आहे.
 
Top