बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ, अमर
    याप्रसंगी वायुपुत्र नारायण जगदाळे, जनरल सेक्रेटरी जयकुमार शितोळे यांच्या हस्ते शाहिर दिलीप तुपसुंदर यांना गौरविण्यात आले. संत तुकाराम सभागृहात दोन दिवस विविध कार्यक्रमांनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संदीप अलाट, कार्याध्यक्ष प्रा.मधुकर फरताडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, महादेव कोळी समाज संघटनेचे संतोष लावंड, सचिव उमेश पवार, सुशांत गायकवाड, ऍड्.अमोल अलाट, सुमेध निरगुडे, विश्वनाथ महापुरे, अशोक गवळी, भारत कदम, महादेव मस्के आदी उपस्थित होते.
    शाहिर दिलीप तुपसुंदर यांनी सादर केलेल्या डॉ.आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील पोवाड्यांना श्रोत्यांनी दाद दिली. सावित्रीबाईंची विद्यार्थीनी पहिली, मिळाला पहिला मान, लहुजींची लेक लाडकी, मुक्ताबाई गुणवान, शाहिरात तू शाहिर कवी कादंबरीकार, माझ्या अण्णाभाऊ सारखा शाहीर नाही होणार अशा अनेक रचना शाहिरी जलसामध्ये सादर करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुहास पवार, विनोद पवार, अमृत अलाट, शब्बीर मुलाणी, राम नवले यांनी परिश्रम घेतले.
शेख पविचार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शाहिर अमरशेख जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.   
 
Top