बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) हिंदू मावळ्यांनी भगवी पताका घेऊन  जुलमी  राजवटी धुळीस मिळवून हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याचा गौरवशाली इतिहास आपल्याला लाभला आहे. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
आत्तापर्यंत १३ राज्यांमध्ये १००० यशस्वी हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आल्या आहेत. नुकतीच करमळी, गोवा येथे १००० वी हिंदू धर्मजागृती सभा उत्साहात पार पडली. याच पध्दतीने गुरूवारी, ५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी बार्शी येथील अलिपूर रोडवरील रेणूका मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५.३० यावेळी ही सभा होणार आहे. बार्शी शहरातील ही ३ री मोठी सभा आहे. मागील दोन्ही सभांना हजारोंच्या संख्येनी उपस्थिती होती. सभेच्या प्रसारासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्‍यांच्‍या जोडीला हिंदुत्वनिष्ठही प्रयत्न करत आहेत. विविध माध्यमातून होणा-या धर्मसभेच्या प्रसाराला बार्शीकरांचा उत्‍सर्फुत प्रतिसादही मिळत आहे.
   
 गोहत्या, जिहादी आतंकवाद ,धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदू विरोधी कायदे आणि हिंदूंच्याच सणाला होणा-या दंगली यासारख्या समस्यांनी भारतभरातील हिंदू त्रस्त झाले आहेत. त्या विरोधात हिंदूंना संघटीत करण्यासाठी समितीच्या वतीने धर्मजागृती सभांचे आयोजन केले जाते. या सभांमुळे अनेक युवकांकडून व्यसनाचा त्याग व धर्मपालनास आरंभ झाला आहे. काही गावांत हिंदूचे गट एकमेकांतील मतभेद त्यागून एकत्र आले आहेत. अनेक धर्मप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मरक्षणार्थ संघटीत झाल्या आहेत. देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद, धर्मविरोधी कायदे, गोहत्या भ्रष्टाचार, राज्यकर्त्‍यांचा धर्मद्रोह आदिंविरोधात हिंदू जागृत झाले आहेत. या धर्मजागृती सभेचा प्रसार पुढील प्रकारे करण्यात येत आहे - घरोघरी जाऊन लोकांना धर्मसभेची माहिती देणे आणि कोपरा सभा घेणे, शिववंदना गटांतील धर्माभिमानी युवक, तरुण मंडळांमधील कार्यकर्ते, महाविद्यालये, शाळा येथील युवक, मंदिरे, बचतगट, भजनी मंडळे, वसतीगृहे, अभ्यासिका, दुकाने, आस्थापने आदी २५० हून अनेक ठिकाणी उपस्थित असणा-या सहस्त्रो धर्माभिमान्यांपर्यंत हिंदुत्व अन् धर्माशिक्षण यांची आवश्यकता सांगून संघटित करणे आदी माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. विविध गटांना प्रबोधनपर ध्वनीचित्रचकत्या दाखवल्या जात असून सार्वजनिक ठिकाणी फलक लिहीणे, रिक्शांवर धर्मसभेचे निमंत्रणाचे पत्रक लावणे, चौकाचौकांमध्ये होर्डिंग लावणे,  नानाविध माध्यमातून धर्मजागृती सभेची आवश्यकता आणि महत्त्व यांविषयी अवगत करण्यात येत आहे. आतापर्यंत भित्तीपत्रके आणि हस्तपत्रके वितरीत करण्यात आली आहेत. फेसबूक, ई-मेल, व्हॉटस् अप, लघुसंदेश यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन प्रसार करण्यात येणार आहे. धर्मसभेच्या प्रसाराला सकारात्मक आणि  प्रतिसाद लाभत असून अनेक ठिकाणी धर्माशिक्षण वर्ग सुरु करण्याची मागणी समाजातून होत आहे. सभास्थळी धर्माशिक्षणविषयक, तसेच हिंदूंवर होणा-या अन्यायाची माहिती देणारे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.  हिंदूंनी मोठया संख्येनी या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या सभेला सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख, रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे मार्गदर्शन करणार आहेत.

 
Top