नळदुर्ग - मुर्टा ता. तुळजापूर येथे नळदुर्गच्‍या अध्‍यापक विद्यालयाचे फिनिक्‍स छात्रशिक्षक सेवाकाल शिबीर दि. 2 फेब्रुवारी  रोजी पासून सुरू होत आहे. 
   श्री स्‍वामी विवेकानंद शिक्षण संस्‍था कोल्‍हापूर संचलित अध्‍यापक विद्यालय नळदुर्ग येथील द्वितीय वर्षाचे छात्राशिक्षक सेवाकाल शिबीर दि. 2 ते 13 फेब्रुवारी या कालावधित होत आहे. या शिबीराचे उदघाटन मुर्टा गावातील जि.प. प्राथमिक शाळेत सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटक म्‍हणून सरपंच सौ. आशा गुंजकर, अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य अंकुशराव एस.के तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपसरपंच सत्‍यवान सुरवसे, जयसिंग गवळी, सुधीर सुरवसे, सुनिता करदुरे, केंद्रप्रमुख कानडे आर.एल, घोडके एन.बी, आदींची उपस्थिती राहणार आहे.  शिबीर कलावधीत अध्‍यापन कार्य, वर्ग सजावट, अंधश्रध्‍दा निर्मुलन कार्यक्रम, प्रथमोपचार, आरोग्‍य तपासणी, वृक्षारोपण, एकदिवसीय सहल, ग्रामस्‍वच्‍छता, बौध्दिक व क्रीडा स्‍पर्धा, घटक चाचणी, सांस्‍कृतिक कार्यक्रम,आदी उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. शिबीराचे समारोप शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी तुळजापूर पं.स. विस्‍तार अधिकारी सर्जे जी.एन यांच्‍या हस्‍ते होत आहे.     

 
Top