उस्मानाबाद -  जागतिक ‍महिला आरोग्य दिनाचे  औचित्य साधुन जिल्हा सामान्य  रुग्णालयात नुकतेच जिल्हास्तरीय महिला आरोग्य अभियान पंधारवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. या पंधरवाडयाचे उदघाटन जिल्हा परीषदेचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वसंत बाबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार  उपस्थित होते. 
           महिला आरोग्य अभियान पंधरवाडानिमीत्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पंधरवाडा 12 मार्चपर्यंत गावपातळीवर राबविण्यात येणार आहे.  जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये राबविण्यात  येणार आहे.‍या पंधरावाडयाचे मुख्य  उददेश महिलांचे आरोग्य सुधारणे आहे.
         दि. 28 फेब्रुवारी  ते 2 मार्च या दरम्यान जिल्ह्यातील 100 टक्के गरोदर मातांची नोंदणी  व आरोग्य तपासणी. 3 मार्चला महिला मेळाव्यात आरोग्य सेवेची माहिती दिली जाईल.  4 ते 6 मार्च या दरम्यान असांसर्गीक आजाराचे उच्च रक्तदाब , डायबेटीस, कॅन्सर, मोतीबंदू निदान व उपचार करण्यात  येतील.
         दि. 7 ते 9 मार्च या कालावधीत  आरोग्य संस्था सुसज्य बनवण्याकारीता उदा- सुसज्य यंत्रसामुग्री, सुसज्ज इमारतीबाबत कार्यवाही केली जाईल. 10 ते 12 मार्चच्या दरम्यान बालकांचे 100 टक्के लसीकरण. पंधरवाडया  दरम्यान जिल्हा रुग्णालय व उप जिल्हा रग्णालय स्तरावर रक्‍तदान शिबीरे, मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरे, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शिबीरे व आयुष शिबीरे घेण्यात येतील.
या पंधरवाडयात आरोग्‍य संस्थेतील सर्व वैदयकीय अधिकारी व कर्मचारी तसेच अशासकीय संस्थेच्या समन्वयाने कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्राथमिक आरोग्‍य केंद्र अणदूर, व ग्रामीण रुग्णालय सास्तूर , लेप्रोक्सोपी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रा. आ. केंद्र आणदूर येथे कॅन्सर कर्करोगासंबधि विशेष  शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  करण्यात आले आहे.

 
Top