उस्मानाबाद - जिल्हा आहार समितीच्या ठरावानूसार अंगणवाडीतील बालकांना नियमीतपणे आहार पुरवठा करण्याबाबत स्थानीक पातळीवरील सक्षम  व पात्र महिला बचत गट, नोदणीकृत महिला मंडळ/ संस्थेची  निवड करण्यात येणार आहे. इच्छुक पुरवठा धारकांनी विहीत नमुन्यात आपले प्रस्ताव 11 मार्चपर्यंत सादर करावेत. अर्जाचा विहीत नमुना अटी व शर्ती यांचा तपशील संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत  व कामकाजाच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवशी मिळेल.
       विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह 11 मार्चपर्यत एकात्मिक बाल विकास सेवा योजन कार्यालयात सायांकळी 5 वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत सादर करता येतील. मुदतीमध्ये विहीत नमुन्यातील  व आवश्यक त्या कागदपत्रासह प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र महिला बचत गटांची यादी संबधित एकात्मिक बाल विकास सेवा योजन कार्यालयात सूचना फलकावर 16 मार्च, 2015 पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
           यादी प्रसिध्द झालेल्या तारखेपासून 5 दिवसापर्यंत अर्जदांराच्या पात्र व अपात्रतेसंबंधी हरकती मागविण्यात येतील. संबधितांनी आपल्या हरकती लेखी स्वरुपात  21 मार्चपर्यंत संबधित बाल विकास सेवा योजन कार्यालयात सादर कराव्यात. हरकती विचारात घेवून 23 मार्च रोजी इच्छुकांची अंतीम यादी संबधित एकात्मिक बाल विकास सेवा योजन प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल.
निवड करण्यात आलेल्या महिला बचत गटांना आहार पुरवठा करण्याचे आदेश शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तीच्या आधीन राहून  निर्गमीत करण्यात येतील तसेच वेळोवेळी बदलण्यातआलेले शासन निर्णय बंधनकारक राहतील याची सबंधितांनी नोद घ्यावी, असे जिल्हा स्‍तरीय समितीचे अध्यक्ष  तथा जिल्हा परिषद, उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी व समितीचे सदस्य सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.       

 
Top