बार्शी - आजकालची पिढी ही वाचण्यापेक्षा नाचण्यात गुंतलेली पिढी दिसून येते. मानवाच्या शरीराचे दोन भाग आहेत, एका भागासाठभ मिष्टान्नयुक्त खाद्यपदार्थ तर दुसरा मेंदूकडील भाग आहे त्याला बौध्दीक खाद्यांची गरज आहे. या दोन्ही भागांच्या विकासांसाठी सकस आहार पुरविल्याशिवाय योग्य वाढ होत प्रतिपादन साहित्यीक रामचंद्र इकारे यांनी केले.
बार्शीतील लक्ष्मीबाई जगदाळे हौसिंग सोसायटीमध्ये सुरु केलेल्या शिवसेवा वाचन संस्कृती वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक वायुपुत्र जगदाळे, मधुकर डोईफोडे, धुमाळ सर, डॉ.सुनिल पाटील, किरण गाढवे, प्रा.शशिकांत धोत्रे, तुकाराम पाडे, महादेव देशमुख सर, पी.एस.पाडे आदी उपस्थित होते.
इकारे म्हणाले, वाचनालय सुरु करण्यामागे प्रत्येकाच्या घरात शिवाजी आणि त्यांच्या पाठीशी जिजाऊंसारखी माता खंबीरपणे उभी रहावी हा उद्देश आहे. आजकाल फेसबुक, व्हॉटस्‌अप, व्टिटरसारख्या सोशल मिडीयामध्ये गुंतलेल्या पिढीला महापुरुषांच्या ऐतिहासिक शौर्यकथा व आत्मचरित्रांच्या वाचनासाठी वेळ नसल्याने सध्याची समस्या निर्माण होत आहे. माणसा माणसांतील आत्मियता कमी होत असल्याने विभक्त कुटूंब पध्दती दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचा सविस्तर अभ्यास करणे गरजेचे आहे. चार अंध व्यक्तींनी हत्तींची वेगवेगळी व्याख्या केल्याप्रमाणे ज्ञानग्रहण केल्यास खरे शिवाजी महाराज समजणार नाहीत.

 
Top