बार्शी -  येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसाक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.चंद्रकांत पवार यांची संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थेचे जनरल सेक्रेटरी व्ही.एस.पाटील व प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे यांच्याहस्ते देण्यात अले. यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक प्रमोद जाधाव, कार्यालय अधिक्षक भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
 
नुतन उपप्राचार्य प्रा.चंद्रकांत पवार यांनी श्री शिवाजी महाविद्यालयात सुमारे ३४ वर्षे भौतिकशास्त्र या विषयात अध्यापनाचे कार्य केले आहे. महाविद्यालयातील त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभवाचा लाभ उपप्राचार्य पदावर आल्यानंतर प्रशासकीय निर्णय घेताणा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष डॉ.जी.एम.पाटील, सहसचिव जयकुमार शितोळे, खजिनदार अरूण देबडवार यांच्यासह सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. 

 
Top