नळदुर्ग -  नंदगाव ता. तुळजापूर येथील एका अल्पवयीन मुलीच्‍या विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस  उस्मानाबाद  अतिरिक्त सत्र न्यायाधीश  तथा विशेष न्यायाधीश एस.आय.पठाण यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना २0 मे २0१४ रोजी तुळजापूर तालुक्‍यातील  नंदगाव येथे घडली होती.
   गुरूसिध्दप्पा आनंद कोरे रा. नंदगाव ता. तुळजापूर असे सक्‍तमजुरी ठोठावलेल्‍या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी  अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी.वाय.जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील एका  अल्पवयीन मुलीचा गावातीलच गुरूसिध्दप्पा आनंद कोरे याने २0 मे २0१४ रोजी विनयभंग केला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास हवलदार  एस.एस.मनगिरे यांनी  करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस.आय.पठाण यांच्या समोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी.वाय.जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश एस.आय.पठाण यांनी आरोपी गुरूसिध्दप्पा आनंद कोरे यास भादंवि कलम ३५४ / अ व बालकाचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदाचे कलम ८ प्रमाणे दोषी धरून ३ वर्षे सक्तमजुरी व ३000 रूपये दंड, दंड न दिल्यास अणखी ६ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याचे अँड. जाधव यांनी सांगितले.

 
Top