उस्मानाबाद -  इंदिरा आवास योजना/ रमाई आवास योजनेअंतर्गत 5 हजार 114 घरकुल बांधकामाचे या जिल्हयास उददीष्ट असून अनूसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी घरकुलाचे बांधकाम तातडीने होण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी  तात्काळ ग्रामसेवक, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, लाभार्थींच्या बैठका घेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत, जे या कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी दिल्या. येथील जिल्हा परीषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची सभेत रावत बोलत होते.
            श्रीमती रावत पुढे म्हणाल्या की, इंदीरा आवास योजनेअंतर्गत 2014-15 मध्ये 1 हजार 925 घरकुलाचे उदिष्ट देण्यात आले आहे. घरकुलाचे बांधकाम गट विकास अधिकाऱ्यांनी  फेब्रुवारी अखेर 100 टक्के पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. किरकोळ कामाअभावी कामे अपूर्ण असतील तर ती तात्‍काळ करुन घ्यावीत. ज्‍या ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेवून कामास सुरुवात केली नाही, अशा लाभार्थ्यांवर 420 च्या केसेस दाखल करुन कार्यवाही करण्यात यावे.असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.
  या बैठकीत महाराष्ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्नती  अभियान माहे जानेवारी 2015 आर्थीक कामांचा आढावा घेण्यात आला. नॉन इंटेसीव्ह अंतर्गत उमरगा, कळंब, वाशी , भूम व परंडा या 5 तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. स्वयंसहायता गटांना खेळते भांडवलाचे 227 चे उददीष्ट देण्यात आले असता आतापर्यंत 248  साध्य करुन 109.25 टक्के काम पूर्ण झाल्याबदृल प्रकल्प संचालकाच्या  कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
पुर्नगठीत स्वयंसहायता समुहाचे 160 चे उदिदष्ट असताना प्रत्यक्षात 130 साध्य करण्यात आले. त्याची टक्केवारी 81.25 आहे. वाशी तालुक्याने 20 पैकी 20 काम साध्य करुन 100 टक्के काम पूर्ण केले. उमरगा तालुक्‍यास 40 चे उदीष्ट देण्यात आले होते त्यापैकी 36 साध्य करुन 90 टक्के काम पूर्ण केले. कळंब तालुक्यास 40 चे उददीष्ट असताना 32 साध्‍य करुन 80 टक्के काम पूर्ण केले. परंडा तालुक्यास 20 चे उददीष्ट देण्यात आले  असता त्यापैकी 18 साध्य करुन 90 टक्के कामाची पूर्तता केली आहे. गटविकास अधिकारी वाशी, उमरगा, कळंब, परंडा यांनी योग्य नियोजन करुन  फेब्रुवारी अखेर 100 टक्के काम पूर्ण करण्याच्याबाबत सूचना यावेळी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
स्वयंसहायता समूहाची बॅक जोडणी कार्यक्रमांतर्गत  बँकेस 542 प्रकरणे बँकेस पाठविण्यात आली असताना बँकेने 229 प्रकरणास प्रत्यक्ष वाटप करण्यांत आले. उर्वरीत 207 प्रकरणे बँकेकडे प्रलंबित असल्याने जिल्हा अग्रणी बंकेनी सर्व बँकर्सच्या बैठका तातडीने घेवून प्रलंबित प्रकरणे तातडीने  निकाली काढयाबाबत निर्देश दिले. एस बी आय बँकेकडे 118 प्रकरणाची प्रस्ताव सादर केले असताना प्रत्‍यक्षात 77 प्रस्ताव मंजूर केले आहे. एस बी एच बॅकेकडे 87 प्रस्ताव सादर केले असताना 61 प्रकरणे मंजूर केले. बी ओ एम बॅकेकडे 93 प्रस्ताव सादर केले असताना या बॅकेने 63 प्रस्ताव मंजूर केले आहे. एम जी बी बँकेकडे 233 प्रस्ताव पाठवले असता त्यापैकी 130 प्रकरणे मंजूर केले. बी ओ आय बँकेकडे 11 प्रस्ताव सादर केले असता बॅकेने 4 प्रकरणास मंजूरी  दिली. उर्वरीत प्रस्तावास बँकेने माहे फेब्रुवारी 2015 अखेपर्यंत मंजूर करण्याच्या सूचनाही सुमन रावत यांनी सर्व बॅक अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियांनातर्गत 18 ते 35 वयोगटातील दारीद्रय रेषेखालील युवक युवतींना प्रशिक्षण वेतन रोजगारासाठी दोन संस्थेंची निवड करण्याचे ठरले.‍
सामाजिक आर्थीक जात सर्व्हेक्षण-2011  अंतर्गत यादी प्रसिध्द करणे, दावे आक्षेप स्वीकारणे व अंतीम यादी विहीत मुदतीत प्रसिध्द करण्‍याची कार्यवाही सुरु असून सदया 936 अपीले प्राप्त झाली असून 416 प्रकरणे निकाली काढण्यात आली   आहेत. 520 अपीले निकाली काढण्याची कार्यवाही सुरु असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. गट विकास अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक कामे करावीत संबंधित कुटुंबाची माहिती विहीत प्रपत्रात बिनचूक भरुन सादर करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

 
Top