उस्मानाबाद - शिक्षक हा सोशल इंजिनीअर असतो. समाजाची  प्रगती केवळ शिक्षणामुळे  होते. समाज जडणघडणीत शिक्षकांचे महत्वाचे योगदान महत्वाचे असते. युवा-भावी शिक्षकांनी  समाज सुधारण्याच्या कामात झोकून देवून  सुसंस्कृत पिढी  निर्मीतीच्या कार्यात  योगदान दयावेत, असे आवाहन एस. एस. भोसले यांनी केले.
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादवतीने उस्मानाबाद तालुक्यातील जिल्हा परीषद प्रशाला कौडगाव येथे डीटीएड व्दितीय वर्ष छात्रापध्यांपकांचे छात्रसेवाकाल शिबीर शिबीराचे उदघाटनप्रसंगी   भोसले बोलताना केले. 
           प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर  शिबीर आयोजित करण्यात आले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात गट शिक्षणिकारी  श्रीमती शिंदे बोलताना म्हणाले की,‍या शिबीराच्या माध्यमातून  भावी शिक्षकांनी  विज्ञान युगाशी समन्यव ठेवून  आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन ज्ञान प्राप्त करण्याचा मौलीक सल्ला दिला. शाळेचे मुख्याध्यापक शेख यांनी सदयाच्या शिक्षणपध्दतीत तंत्रज्ञान आल्याने अमुलाग्रह बदल झाल्याचे नमुद केले. प्रास्ताविकात  श्री. गजधने यांनी शिबीर आयोजनामागील भुमीका स्पष्ट केली.
सूत्रसंचलन अंजली माळी यांनी केले तर आभार दहिहांडे पल्लवी यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आगाळे कांचन व उप मुख्याध्यापक आहेर निशा शाळेतील शिक्षकवृंद व  पोलीस पाटील विरसिंह थोरात यांनी परीश्रम घेतले. 
          येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादवतीने उस्मानाबाद तालुक्यातील जिल्हा परीषद प्रशाला देवळाली येथे डीटीएड व्दितीय वर्ष छात्रापध्यांपकांचे छात्रसेवाकाल शिबीर शिबीर मुख्याध्यापक छाया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या शिबीराचे उदघाटन श्री. मोकाशे पी एम विस्तार अधिकारी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहूणे म्हणून भागवत देशमुख, प्रा. राजूगुरु होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक भोयटे पुजा यांनी केले तर आभार रवीना भोयटे यांनी  मानले.               

 
Top