उस्मानाबाद -   उस्मानाबाद तालुक्यातील नापीक व कर्जबाजारपणामुळे आत्महत्या केलेल्या 10 पात्र शेतक-यांच्या वारसास जिल्हा प्रशासानाच्यावतीने प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. संबंधीत शेतक-यांच्या वारसांना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, उपविभागीय  अधिकारी शिल्पा करमरकर, तहसीलदार सुभाष काकडे  आदि उपस्थित होते.
आत्महत्या केलेले उस्मानाबाद तालुक्यातील शेतकरी पुढीलप्रमाणे आहेत. यात बाबासाहेब जगताप रा.रुईभर,सुरेश नरटे, रा. दाऊतपूर,  यशवंत ऊर्फ दादा माळदवळकर, रा. सोनेगाव, उत्रेश्वर रोटे, रा. वरुडा, काका मुळे, रा. आरणी, महेबुबअली शेख, रा. सारोळा, बळीराम बोडके, रा. कोल्हेगाव, गणेश मगर, रा. वाघोली, भारतबाई निलंगे, रा. पाटोदा, आणि शंकर लांडगे, रा. मेंढा या आत्महत्या केलेल्या शेतक-यांचा समावेश आहे.

 
Top