बार्शी -  प्लॉटींगची जमीन खरेदी विक्रीच्या पैशावरुन झालेल्या वादात महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग केला व तिघांना मारहाण केल्याच्या फिर्यादिवरुन बार्शी पोलिसांत मध्यस्ती व स्टँपविक्रेत्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पिडीत महिलेने स्वत: फिर्याद दाखल केली आहे.
महेश प्रकाश देवळे (वय 34 रा. उपळाई रोड) , आप्‍पा देवळे, दाद उर्फ किसन देवळे, रितेश वाघमारे (वय 22 रा. बारंगुळे प्‍ल्‍ॅट ), राहुल दशरथ बारंगळे (वय 21 रा. मंगळवार पेठ), सागर धनराज मगर (रा. शेंडगे प्‍ल्‍ॅट) व अन्‍य एक अनोळखी इसे तक्रारीतील आरोपींची नावे आहेत. पिडीत महिलेच्‍या कुटुंबाने 20 लाख रूपये देवून साठेखत केले होते. त्‍याची मुदत संपल्‍याने सदरची जमीन कायम खरेदी द्यावी अथवा दिलेली रक्‍कम परत मिळावी यासाठी त्‍यांच्‍यात वाद झाला होता.  यावेळी जनावरे बांधण्‍याच्‍या लोखंडी मेकने तिघांना मारहान केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. पद्मकृष्‍ण मंगल कार्यालयाजवळ शनिवारी सदरचा प्रकार घडला. यातील पिडीत महिला,तिचा पती व मुलगा जखमी झाले आहेत. महिलेचे पाच तोळे सोन्‍याचे मंगळसुत्र आरोपींनी नेल्‍याचे फिर्यादित म्‍हटले आहेत. याप्रकरणी आप्‍पा देवळे, दादा देवळे, सागर वाघमारे,राहुल बारंगुळे या चौघाना अटक करण्‍यात आली आहे. सहदिवाणी न्‍यायादिधीश प्रथम वर्ग न्‍यायादंडाधिकारी भागवत झिरपे यांच्‍या न्‍यायालयासमोर चौघांना हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्‍यात आली असून रितेश वाघमारे व अन्य अनोळखीचा शेध घेण्‍याचे काम सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बेंद्रे हे पुढील तपास करित आहेत.

 
Top