वैराग (महेश पन्‍हाळे)  जिल्‍ह्यात स्‍वाईन फ्लूचे चे संशयित व बाधित रूग्‍ण वाढू लागले असून बार्शी तालुक्‍यामध्‍येही एक संशयित रूग्‍ण आढळला आहे. परिणामी बार्शी तालुक्‍यामध्‍येही हा आजार पसरण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे तालुक्‍यातील आरोग्‍य यंत्रणेकडून याबाबत करण्‍यात येणारी जनजागृती व उपाययोजना आदी कामांचा आढावा जिल्‍हा परिषदेचे सभापती मकरंद निंबाळकर आणि बार्शी पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब काशिद यांनी घेतला.
            23 फेब्रुवारी पर्यत जिल्‍हृयातील 1 हजार 546 नागरिकांच्‍या केलेल्‍या तपासणीमध्‍ये 45 नमुने संशयित तर 21 बाधित आढळले आहे. त्‍यामुळे स्‍वाईन फ्लूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालले असल्‍याचे दिसून येत आहे. या वाढत्‍या प्रमाणाला आवर घालण्‍यासाठी प्रशासनाच्‍या सोबत सामान्‍य नागरिकांनीही काळजी घेणे महत्‍वाचे आहे. स्‍वाईन फ्लूच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे ग्रामस्‍थांनी घाबरून न जाता काळजी घेणे महत्‍वाचे आहे. त्‍यासाठी आरोग्‍य प्रशासनाला उपाययोजना व जनजागृती करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. हे आदेश योग्‍य तसा पाळला जातो का ? प्रशासन खरे सज्‍ज आहे का ? याची पाहणी करण्‍यासाठी  आरोग्‍य सभापती मकरंद निंबाळकर यांनी पालगाव प्राथमिक आरोग्‍य केंद्रास अचानक भेट देवून पाहणी केली. पाहणी दरम्‍यान बार्शी पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब काशिद हे उपस्थित होते. 
    गावो गाव जनजागृती करण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. यावेळी पालगाव प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड यांनी प्रत्‍येक घराचा घर टू घर सर्वे करून संशयित व बाधित रूग्‍णांचा शोध घेण्‍याचे काम चालू असल्‍याचे सांगितले.  येथील  आरोग्‍य केंद्राची शस्‍त्रक्रिया विभागच बंद होता. प्रथम दर्शनी रूग्‍णचे रक्‍त सांडल्‍याचे आढळून आले. ते स्‍वच्‍छ न करात तसेच वाळलेले दिसत होते. याशिवाय एक शिपाईच आढळून आला. स्‍वाईन फ्लूचा वाढता प्रसार गांभीर्याने घ्‍यावा व काळजी कशी घ्‍यावी याचा प्रचार करावा असे सभापती मकरंद निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. कोणत्‍याही स्थितीमध्‍ये घाबरून न जाता सर्वप्रथम काळजी व नंतर उपचार घ्‍यावेत. सर्व आरोग्‍य केंद्रामध्‍ये आवश्‍यक तो औषध उपलब्‍ध करून ठेवण्‍यात अल्‍याचेही निंबाळकर यांनी सांगितले. बार्शी तालुक्‍यातही रूग्‍ण आढळल्‍याने घबरून न जाता काळजी व उपाययोजना करण्‍यात यावे असे अवाहन पंचायत समिती सभपती भाऊसाहेब काशिद  यांनी केले.     

 
Top