वैराग  (महेश पन्हाळे)  एका बाजूने शासन झाडे लावा, झाडे जगवा असा नारा देत असताना दुसर्‍या बाजूने शासनच झाडांची कत्तल करीत आहे, असे विदारक चित्र बाश्री-सोलापूर या राज्य महामार्गावर पहायला मिळत असून वटलेल्या व पडलेल्या झाडांच्या नावाखाली उभीही झाडे तोडून शासकीय झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याबाबत बाश्रीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूग गिळून गप्पच आहे.करोडो रुपये खचरुन शासन झाडे लावण्याचा व जगवण्याचा प्रय▪करीत आहे. मात्र शासनाचेच काही विभाग याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून बाश्री
-सोलापूर राज्य महामार्ग क्रमांक २0४ च्या दुतर्फा वाढलेली झाडे महामार्गासह गावांची शोभा वाढवित उभी आहेत. काही झाडे वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे पडली तर काही वठली. ही धोकादायक बनलेली झाडे केंव्हाही कोसळू शकत असल्याने ती तोडून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बाश्री यांनी एका पत्राद्वारे जवळगावच्या इसमास ९ डिसेंबर २0१४ रोजी कामाचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे काम चालू असताना इतर झाडे तोडली जात असल्याचे समोर आले आहे.
  वटलेली आणि वाहतुकीस अडथळा करणारी पण पडलेली झाडे तोडण्याचे सहाय्याने तोडली जात आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या रहदारीपासून दहा-दहा फूट आतमध्ये असलेली ही झाडे तोडली जात आहेत. जी झाडे अनेक वर्षांपासून आपले अस्तित्व जपत जगली. त्या झाडांनाच तोडले जात आहे. कामाचे आदेश देताना बांधकाम विभागाने पूर्वसूचना देवूनच झाडे तोडायची होती. याशिवाय झाडे तोडत असताना या विभागाचे शाखा अभियंता यांनी स्वत: उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्ही सूचनांना तिलांजली देत केवळ कामाचा आदेश दाखवत जाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. विशेष म्हणजे ही वृक्षतोड चालू असताना बांधकाम विभागाचे मैलकोले (कर्मचारी) प्रत्यक्ष हजर होते पण त्यांना याबाबतची पुसटशी कल्पनाही नव्हती. या खुलेआम वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाच्या शाखा अभियंता व अभियंत्यांना याबाबत काहीच माहित नसल्याचेही समोर आले आहे. या वृक्षतोडीमुळे गरज नसणार्‍या झाडांच्याही फांद्या तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिवंत झाडे तोडण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा संतप्त सवाल प्रवाशी करीत आहेत.
        कोणती झाडे, कोण तोडत आहे, याची मला कल्पना नसून तोडण्यापूर्वी मला कोणत्याही सूचना संबंधिताने दिलेल्या नाहीत. तरी मी याबाबतची अधिक माहिती घेतो. मात्र कोणत्याही स्थितीमध्ये जिवंत झाडे तोडायची नाहीत.- ठाकूर, शाखा अभियंता.
           वैराग वाळलेली व पडलेली झाडे तोडण्यास सांगितले असून जिवंत झाडे तोडण्यास सांगितलेले नाहीत. त्यातूनही जर जिवंत झाडे तोडली गेली असल्यास योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल.   - एस.बी. बळी, अभियंता सार्व. बांधकाम उपविभाग.

 
Top