बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  मराठी भाषेत भविष्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक निर्माण व्हावेत ग्रामीण साहित्य हे बोली भाषेतील व वास्तववादी विचार मांडणारे आहेत. ग्रामीण साहित्याने मराठीला चांगले दिवस आले आहेत. या साहित्याने मराठी भाषेत मोलाची भर घालण्याचे काम केल्‍याचे विचार प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे यांनी व्यक्त केले.
    श्री. शिवाजी महाविद्यालात कुसुमाग्रज यांचा जन्‍मदिवस मराठी राज

भाषा गौरव दिन व जागतिक मराठी दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.भारती रेवडकर, प्रा.डॉ.राजेंद्र दास, प्रा.डॉ.बी.डी.पारसे, प्रा.डॉ.रविकांत शिंदे, प्रा.विजयश्री गवळी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य फरताडे म्हणाले मराठी भाषेतील शब्द इतर भाषेत घेतले जात आहेत यामुळे इतर भाषाही मराठी शब्दाने संमृध्द होत आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षा प्रा.डॉ.भारती रेवडकर म्हणाल्या भाषांच्या अभ्यासातून जीवनातील मुल्‍य समजते. मानवतावाद, माणुसकी यांना अधोरेखित करणारे साहित्य कुसुमाग्रजांनी निर्माण केले. साहित्यातून खरे ज्ञान मिळते. मराठी भाषेने आज पर्यंत ज्ञान देण्याचे कार्य केले. माधुर्य, सौंदर्य असलेली भाषा म्हणाजे मराठी भाषा आहे. ग्रामीण मराठी बोली भाषा अतिशय सुंदर आहे. मराठी भाषेचा शब्द संग्रह वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेतील साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. प्रा.डॉ.राजेंद्र दास म्हणाले माणसांच्या मनाला जोडते ती भाषा असते. मराठी भाषा मोठ्या साहित्यींकापसून ते प्रत्येक मराठी भाषीकांनी आपल्या लिखाणाने संमृध्द केली आहे. प्रास्ताविकात प्रा.डॉ.बी.डी.पारसे यांनी नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने मराठी भाषेच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले. मराठी भाषा संमृध्द करण्याचे काम आज पर्यंत अनेक साहित्यिकांनी केले. कुसुमाग्रजांनी एकूण सोहळा कविता संग्रह, तीन कादंबर्‍या, आठ कथासंग्रह यांच्यासह एकांकीका, नाटक लिहिले. त्यांची ओळख भारताचे शेक्सपिअर, मानवतेचे कवी अशी होती. प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज व भालचंद्र नेमाडे यांच्यावर आधारित भित्ती पत्रकाचे उद्घाटन, कवी कुसुमाग्रज व कर्मवीर डॉ.ममासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले.  यावेळी स्वाती कोकरे,  संध्या काळे, करिश्‍मा गायकवाड या विद्यार्थींनीनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.रविकांत शिंदे यांनी मानले.


 
Top