नळदुर्ग :- किरकोळ कारणावरुन दलित युवकास जातीवाचक शिवीगाळ करुन काठ्या व तलवारीने केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर नळदुर्ग येथे घडली. याप्रकरणी सोळा जणांविरुध्द बुधवारी उशिरा पोलिसांत अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मोईन इब्राहिम शेख, अशपाक चॉंद शेख, हाबू बाबुलाल शेख, इस्ताक जहागिरदार, फिरोज मलंग शेख, यजदानी सत्तार शेख, सद्दाम मैनोद्दीन शेख, सद्दाम बाबू शेख, जाफर शेख अहेमद शेख, बिलाल कुरेशी, अजमल महमदअली डोंगरे, मुजमल महमदअली डोंगरे, वसिम निजाम शेख, आदम जहागिरदार, अकबर शेख, मलंग दस्तगीर शेख (सर्व रा. इंदिरानगर, नळदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील फिर्याद दयानंद बाबू गायकवाड (वय 24, धंदा मजूरी, रा. इंदिरानगर, नळदुर्ग) हा मंगळवार रोजी सायंकाळी कामावरुन घरी जात असताना इंदिरानगर येथील मारुती मंदिराजवळ त्याचा भाऊ रणजित गायकवाड, खंडू लक्ष्मण कोळी यांच्यासमवेत मलंग शेख, मुजमल महमदअली डोंगरे, वसीम निजाम शेख यांच्यात भांडण चालू होते. त्यांच्या हाता काठ्या होत्या. तलवारी घेऊन येवून जातीवाचक शिवीगाळ करुन तिघांस मारहाण केली. यावेळी फिरोज शेख याने त्याच्या हातातील तलवारीने दयानंद गायकवाड याच्या डोक्यास उजव्या बाजूस वार केला व इतर दोघास मारहाण करु लागले. यावेळी आरडाओरड ऐकून सोमनाथ महादेव म्हेत्रे, राहुल सुर्यकांत घोडके, राज मुरमे, अमित गायकवाड, बाबू गायकवाड यांनी सोडवासोडवी केली. दयानंद हा जखमी झाल्याने त्यास डॉ. व्यंकट मुळे यांच्या दवाखान्यात प्रथोमोपचार करुन पुढील उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात दाखल केले, अशी तक्रार दयानंद बाबू गायकवाड यांनी नळदुर्ग पोलिसात दिल्याने वरील सोळा आरोपींविरुध्द बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खांडगे हे करीत आहेत.
