मंगळवेढा (समाधान फुगारे) -: मंगळवेढा शहरात रस्त्यावर शौचास बसणा-या नागरिकांना अद्दल घडवण्यासाठी नगरपालिकेने पहाटे ४ वाजल्यापासून हालगी नाद करून कार्यवाही करण्याचे काम सुरू केल्याने आज २० लोटे बहाद्दरांना पकडून पोलिस व्हॅन मधून पोलिस स्टेशनला नेण्यात आले असल्याने लोटे बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
सुरुवातील लोटे बहाद्दूरांना गुलाबाचे फूल देवून सूचना सांगून सोडण्यात येत होते मात्र आजपासून ही कार्यवाही कडक केली आहे . आता पर्यंत ७८८ लोटे बहाद्दूर उघडल्यावर शौचास बसताना सापडले आहेत, त्यांच्याकडून १२० लोटे व १४० बाटल्या नगरपालिकेने जप्त केल्या आहेत. 
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका, तुकाईनगर, भिमनगर, किल्ला भाग, सांगोला नाका, खोमनाळ नाका, शनिवार पेठ  व शहरातील अनेक ठिकाणी लोक उघडयावर शौचास बसतात. या महिला वर्गही मागे नाही. शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने तसेच जागेची कमतरता असल्याने अनेकांना घरात शौचालय असते. याचा विसर पडलेला दिसतो. शौचालयाला जागा आटवून घराजवळ घाण करण्यापेक्षा बाहेर जावून घाण करण्यात अनेकजण वर्षानुवर्षे धन्यता मानत आहेत.
बाहेरील एखादी व्यक्ती शहरात आली की रस्त्याच्या कडेला लाल पिवळया रंगाच्या रांगोळया काढल्यागत व नक्षी काढल्यासारखा प्रकार पाहून बाहेरील मंडळी थक्क झाल्याशिवाय रहात नाही. उघडयावर शौचास बसल्याने लोकांचे आरोग्य बिघडत असून पावसाळयात याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतात. 
नगरपालिकेने शौचालयाची सक्ती केली असली तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. हे लक्षात आल्यानेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी अनोखी तरकीब शोधली असून रोज सकाळी ते काही हालगीवाले व नगरपालिका कर्मचार्‍यांना सोबत घेवून शहरभर फिरत आहेत. 
रस्त्यावर शौचास बसलेला माणूस दिसला की त्याच्या जवळ जावून कर्मचारी हालगी वाजवतात. चार हालग्यांच्या आवाजाने त्या लोटे बहाद्दूराची कानठळी बसते परंतु तो ज्या करता तेथे बसला आहे ते काम त्याचे पूर्ण होवू शकत नाही असे विचित्र अनुभव येवू लागल्याने लोटे बहाद्दूरांनी या हालगी नादचा चांगलाच धसका घेतलेला आहे. 
पहाटे उघड्यावर शौचास बसलेले २० लोटे बहाद्दूरांना पकडून पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले होते ,त्यांना २ तास थांबवून सूचना देवून सोडण्यात आले मात्र उद्यापासून जो नागरिक उघड्यावर शौचास बसलेला असेल त्या प्रत्येकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मंगळवेढा शहराला हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुशंघाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत व्ययक्तिक शौचालय योजना राबविण्यासाठी नगरपालिके मध्ये प्रकल्पची अंमलबजावणी केली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा . नगरपालिकेचे शहरामद्धे ३८८ सिट्सचे शौचालय कार्यरत आहे,अजून ६० सिट्सच्या शौचालायचे काम चालू आहे ,ज्या ठिकाणी किरकोळ दूरस्ती आहे त्याठिकाणी दुरूस्तीचे काम चालू आहे. 
ज्या शौचालायच्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिले आहे, लाइटची ही व्यवस्था करण्यात आली आहे, लवकरच सर्व शौचालायची रंग रंगोटी केली जाणार आहे , नागरिकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शौचालय योजना चालू असून त्याचा लाभ घ्यावा.शौचालया विषयी काही तक्रारी असतील तर नगरपालिका टोल फ्री क्रमांक १८००२३३२२७५ या क्रमांकावर तक्रार नोंदवा असे आवाहन मुख्याधिकारी लोकरे यांनी केले आहे.
या मोहिमेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या समवेत, अधिकारी , कर्मचारी व नगरसेवक प्रवीण खवतोडे,अजित जगताप,चंद्रशेखर कौंडूभैरी,सुहास पंडित तसेच वारी परिवरातील सतीश दत्तू,अजित शिंदे,अविनाथ आवताडे व सामाजिक कार्यकर्ते पहाटे ४ वाजल्यापासून फिरत असतात.
स्वच्छेतेच्या बाबतीत आग्रही भूमिका घेतली असून नागरिकांनी यापुढे उघडल्यावर शौचाला बसू नये जे कोणी उघडयावर शौचास बसलेले आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. – आशिष लोकरे ,मुख्याधिकारी,नगरपालिका मंगळवेढा *  .
 
Top