नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वन्यजीव सप्ताह दि. 01 ते 07 आक्टोबर दरम्‍यान साजरा करण्यात येत आहे. आज गुरुवार दि. 1 ऑक्‍टोबर रोजी सप्ताहाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न झाला. या सप्ताहात व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन, क्षेत्र भेट, निबंध स्पर्धा इत्‍यादीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
या सप्ताहाचे उद्‌घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर हिवरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुहास पेशवे हे होते.  आपल्या उद्‌घाटनपर संदेशात डॉ. चंद्रशेखर हिवरे म्हणाले कि,  आपल्या पिढीला पृथ्वी ही मागच्या पिढीकडून चांगल्या स्थितीत मिळाली आहे ती तुम्ही पुढच्या पिढीकडे त्याच्यापेक्षाही चांगल्या स्थितीत पुढच्या पिढीकडे सुपर्द करा, पृथ्वीवर जैवविविधता संवर्धन झाले पाहिजे अन्यथा या पृथ्वीचे वाळवंट झाल्या शिवाय राहणार नाही. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. रविंद्रजी रेड्डी म्हणाले भारतात वन्यजीवांचे भांडार आहे. परंतु वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे कांही वन्यजीवांचे अस्तित्वच पृथ्वीवरुन नष्ट होत आहे. धोक्याच्या यादीतील वन्यजीवांचे संवर्धन करा तुम्ही स्वत: जगा आणि वन्यजीवांनाही जगु दया.”
पाहुण्यांचे स्वागत प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हंसराज जाधव, प्रा. अनिरुध्द बाबरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. मोहन बाबरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार डॉ. हंसराज जाधव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन घाटे, प्रा. एफ. जे. काझी, सर्जे, कांबळे, हमीद काझी यांनी पुढाकार घेतला.
 
Top