नळदुर्ग :- येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना 18 ते 25 वर्ष दीर्घ मुदतीवर सहयोग / भागिदारी तत्वावर देण्याचा ठराव बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन नरेंद्र बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 32 वी सन 2014-15 ची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली. यावेळी बोलताना बोरगावकर म्हणाले की, शेतकरी सभासद व कामगारांच्या हितासाठी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. साखर आयुक्त पुणे यांच्याकडे हा कारखाना दिर्घ मुदतीने सहयोग/भागिदारी तत्वावर देण्याचा प्रस्ताव पाठविण्यास मंजूरी दिल्याचे सांगितले. तुळजाभवानी कारखाना दिर्घ मुदतीत देण्याचे कारण की, शासकीय देणे, कामगार थकित वेतन व इतर देयक रक्कम, जिल्हा बँकेची एकरक्कमी कर्ज परतफेड करण्याकरीता हा कारखाना 18 ते 25 वर्षाच्या दीर्घ मुदतीवर देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
या सभेस श्री कुलस्वामिनी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन सुनिल (मालक) चव्हाण, श्री तुळजाभवानी कारखान्याचे संचालक गोकुळ शिंदे, अशोक पाटील, अमर मगर, निवृत्ती माळी, खंडू उंबरे, नेताजी पाटील, प्रकाश चौगुले, महादेवाप्पा आलुरे, राजशेखर वडणे तर शेतकरी सभासद लिंबराज कोरेकर, नागनाथ पाटील, सुनिल भोसले, विनायक जाधव, अनिल हंगरगेकर यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी विलास जाधव, गफुर धुरगुडे, शिवाजी डोंगरे, राजेंद्र सुतार, अप्पू स्वामी, सलाम मौजम, कुबेर भोसले, विवेक इंगळे, शिवाजी चव्हाण, तानाजी गंगणे, शंकर चंडके, अनिल केसकर, अजित चव्हाण, खंडू मुळे, जकिर मोकाशे यांच्यासह नागरीक उपस्थित होते. अहवाल वाचन व आभार प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले मानले.
