नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मत्स्यशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमीत्ताने मत्स्यप्रदर्शन तसेच मत्स्य व्यवसायीकांची सहविचार सभा, तज्ञांची व्याख्याने, प्रात्याक्षिके, व्यवसायातील यशस्वीतांची अनुभव कथन इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उदघाटन सत्रात आपल्या उद्घाटनपर मनोगतात मत्स्य महाविद्यालय उदगीर येथील प्रा. सोमनाथ यादव म्हणाले मत्स्य व्यवसाय हा शेती पुरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. हा व्यवसाय आलीकडच्या काळात भरभराटीस येत आहे. दाळींना पर्याय म्हणून आहारात माशांचा समावेश होत आहे. माशांपासुन प्रथीने जास्त प्रमाणात मिळतात. आलीकडच्या काळात शेततळयामध्ये ही मत्स्य पालन केले जात आहे. या व्यवसायात जास्तीत जास्त तरुणांनी यावे व आपले आयुष्य समृध्द करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुहास पेशवे होते प्रमुख उपस्थित उदगीर येथील मत्स्य महाविद्यालयातील प्रा. उमेश सुर्यवंशी हे होते.
या कार्यशाळेनिमित्‍त आयोजित केलेल्‍या मत्‍स्‍य प्रदर्शनाचे उदघाटन अंबेजोगाई येथील योगेश्‍वरी महाविद्यालयाचे प्राणीशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. विश्‍वासराव साखरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या नंतरच्‍या तांत्रिक सत्रामध्‍ये प्रा. उमेश सुर्यवंशी यांचे व्‍याख्‍यान झाले. या सत्रात महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मत्‍स्‍य व्‍यावसायिकांच्‍या सहविचार सभेला प्रमुख वक्‍ते म्‍हणून तुळजापूर तालुक्‍यातील मत्‍स्‍यव्‍यावसायिक प्रविण व्‍हरकट यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी प्रा. डॉ. डी.एम. पठाण, प्रा.डॉ. नितीन पडवळ, प्रा. आर.एस. मादळे, प्रा. अशोक येवले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सांगता समारोप समारोहाने झाली. प्रा.डॉ. विश्‍वास साखरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ. मोहन बाबरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व डॉ. महेश मोटे यांच्‍या आभार प्रदर्शनाने समारोप समारोह संपन्‍न झाला. संपूर्ण कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले.
कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. दिपक जगदाळे, प्रा. अनिरुध्‍द बाबरे, प्रा. एफ.जे. काझी, उमेश सर्जे, हमीद काझी, बाबा कांबळे, सुजित बिराजदार, भगवंत जाधव आदीनी परिश्रम केले.

 
Top