उस्मानाबाद : - मोटारसायकल व स्कार्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात दोनजण जागीच मयत झाले. ही घटना उस्मानाबाद-वरुडा बायवास रस्त्यावर घडली.
सतीश राजाराम मुंडे (42 वर्षे), माणिक उद्धव मुंडे (44 वर्षे) असे अपघातात मयत झालेल्यांचे नाव आहे. सतीश व माणिक हे दोघेजण उस्मानाबादहुन पवारवाडीकडे बाजार करुन मोटारसायकल (क्र. एमएच 24 जी. 9884) वरुन जात असताना औरंगाबाद कडून तुळजापुरकडे भरधाव वेगाने जाणा-या स्कार्पिओ (क्रं. एमएच 24 व्ही. 4982) ची जोराची धडक बसली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
