पांगरी (गणेश गोडसे) :-  बार्शी तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यातील 93 ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून लवकरच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे॰बिगुल वाजल्यामुळे गावकारभा-यांना आपली पत दाखवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे.बिनविरोध निवडणुकीचे वारे हळू हळू लुप्त होताना दिसत आहे. दाखवण्यासाठी तालुक्यात क्रमांक दोनची मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या गुप्त खलबताना गती आली असून ग्रांमपंचायत निवडणूक नको रे बाबा असे म्हणणारे अनेक हौशे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
ओबिसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाची स्वप्ने अनेकांना दिवसा पडू लागली आहेत. सध्या पांगरी ग्रामपंचायतीवर माजी आ.राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व आहे.पंधरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमद्धे राऊत गटाचे तेरा सदस्य होते.होऊ घातलेल्या निवडणुका कांही ठिकाणी तिरंगी तर कांही गांवात चौरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे.मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच निवडणुका कश्या होणार हे कळणार आहे.एक मात्र नक्की की येणारी निवडणूक ही अनेकांच्या घरी दिवाळी घेऊन येणार असल्यामुळे अनेकांचे या निवडणुकीकडे डोळे लागले आहेत.अगोदरच सामोरी असलेली भीषण दुष्काळी स्थिती,कोरडा गेलेला पावसाळा,शेतीच्या सोडा पिण्याच्या पाण्याची निर्माण होऊ घातलेली भयावह स्थिती आदि विविध कारणामुळे सर्वसामान्य  जनतेचा जीव मेटाकुटीला आलेला असतानाच होत असलेली  ग्रांमपंचायतीच्या निवडणूका कांही काळापुरत्या तरी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
  पांगरी परिसरातील पांगरी परिसरातील पांढरी, ऊक्क्ड्गांव, झांनपूर, ममदापूर, खांमगांव, चारे, वालवड, बोरगांव, कारी, गोरमाळे, चिखर्डे, आगळगांव, कोरेगांव, पिंपळगांव, घोळवेवाडी, कुसळंब, पाथरी, धानोरे, शिराळे आदी गावामधील ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्यामुळे येथील निवडनुका पार पडणार आहेत.
    बार्शी तालुक्यात लक्षवेधी ठरण्याची शक्यता असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,अनुसूचीत जाती स्त्री एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकांचा मागास प्रवर्ग एक,प्रभाग क्रमांक तिन येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एक,अनुसूचीत जाती स्त्री एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग क्रमांक चार येथे सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग पाच मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकामचा मागासवर्ग स्त्री एक,नागरिकाचा मागास प्रवर्ग पुरुष एक असे आरक्षण आहे.
 यावर्षी पावसाळा आला त्या मार्गे न बरसता परत गेला आहे.त्यामुळे समोर भिषण दुष्काळ दिसत आहे.त्याही परिस्थितीत चौदाव्या वित्त आयोगाचे गाजर सरकारने दाखवल्यामुळे पैश्यांचा पाऊस पदरात पाडून घेण्यासाठी जो तो तयारीला लागल्याचे चित्र सगळीकडेच दिसून येत आहे.कांहीही झाले तरी चालेल मात्र निवडणूक ही लढवायचीच असा पण अनेक नवख्या उमेदवारांनी केल्याची चर्चा होत आहे.आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकांची देणी घेणी उरकून जुनी घाण काढून टाकण्यात जुनी मंडळी गर्क असल्याचे निदर्शनास येत आहे.निवडणुकीचे तुणतुणे ऐन दिवाळीत वाजणार असल्यामुळे दिवाळी कोणाला साधणार व कोणाचे दिवाळे काढणार हे येणारा काळच दाखवणार आहे.
 
Top