पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) येथील राहुल गरड यांची डिसीपीएस धारकांच्या राज्य अभ्यास गटाच्या राज्य निमंत्रकपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 अंतर्गत राज्यातील 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या ग्रामसेवकांना पेन्शन योजनेबाबत न्याय मिळवून देण्यासाठी नुकताच पुणे येथील जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकने यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे कोषध्यक्ष बापूसाहेब अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील डिसीपीएस धारकांचा मेळावा पार पडला होता.
या मेळाव्यात विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. काल मर्यादित कार्यक्रम निश्चित करून डिसीपीएस धारकांना राज्य युनियन मार्गदर्शक म्हणून काम करणे, सदर प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास गट तयार करणे आदि विविध ठराव या मेळाव्यात घेण्यात आले होते.यावेळी जिल्हा पतसंस्थेचे संचालक दीपक गोरे,गणेश पाटील,पद्मराज जाधवर,किरण वाघमारे,राजेंद्र चौरे,नितिन शेलार,तात्या नाईकनवरे,संतोष लादे आदी उपस्थित होते.त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून ग्राम विकास अधिकारी श्री.राहुल गरड यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष श्री.ढाकने व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी नियुक्तीचे पत्र नुकतेच श्री.गरड यांना सुपूर्द केले. ते सध्या उपळाई (ठो) येथे कार्यरत असून निवडीबद्दल जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश काटे,तालुकाध्यक्ष अनिल बारस्कर,सचिव तात्या साठे आदिसह यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.