जळकोट - राज्यातील गावा-गावात शासनाने स्थापन केलेल्या कृषी विज्ञान मंडळामार्फत जलयुक्त शिवार आभियानची कामे व्हावीत. अशी मागणी एका लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळकोट ता. तुळजापूर येथील श्रीगण्ोश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाने केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात भाजप. शिवसेना युतीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी येत्या पाचवर्षात टप्या - टप्पयाने जलयुक्त शिवार अभियान गावा - गावात राबविले जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गावे या योजनेत समाविष्ट करुन विविध कामे केल्यानंतर यंदाचा पावसाळा झाला. या पावसात योजनेतुन झालेल्या कामात पावसाचे पाणी साचले आहे. याचा चांगला परिणाम दिसुन येत आहे. दुष्काळी भागात याचा अधिक परिणाम भविष्यात दिसणार आहे.
जल युक्त शिवार आभियानची कामे विविध खाते एकत्र येवुन केली जातात. यात जि. प. , ग्रा.पं. , पं. स., कृषी विभाग, वनविभाग आदि विभागाच्या माध्यमातुन शिवार आभियानची केली जात आहेत. सध्या शासनाच्या कृषी विभागाने स्थापन केलेल्या कृषी विज्ञान मंडळे गावा- गावात कार्यरत आहेत. या कृषी विज्ञान मंडळाना कुठलेही आनुदान नाही. धर्मादाय कार्यालयात नोंदणी झालेल्या हजारो कृषी विज्ञान मंडळाना जलयुक्त शिवार आभियानची कामे देण्यात यावीत. हि योजना कृषी विज्ञान मंडळामार्फत राबवावी . गावातील शेती, भौगोलिक व सामाजिक या विज्ञान मंडळाकडे असते. याचा जलयुक्त शिवार आभियानासाठी चांगला होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर श्रीगण्ोश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष मेघराज किलजे यांची स्वाक्षरी आहे.