पांगरी (गणेश गोडसे) महाराष्ट्र शासनाची तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर बंदी असतांनाही विक्रीच्या हेतूने साठा करून त्याची वाहतूक करणार्या बार्शीतील दोघांना 9 लाख रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या गुटख्यासह ताब्यात घेतल्याची घटना काल दि.11 शुक्रवारी रात्री दहा वाजता बार्शी-तुळजापूर मार्गावर शेलगांव (मा) ता.बार्शी येथे घडली.
अस्लम तमिज तांबोळी व मोहन अंकुश शिंदे दोघेही रा.बार्शी अशी आरोपीची नांवे आहेत. रेणुका रमेश पाटील रा.सोलापूर यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपींनी आपल्या एम.एच.13 ए सी 9430 या झायलो गाडीतून महाराष्ट्र शासनाणे अधिनीयमाने प्रतिबंधित व असुरक्षित ठरवलेला गोवा,पान मसाला,विमल,आर.एम.डी,रजनीगंधा आदि विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले.शासनाच्या बंदीच्या आदेशाचा भंग करून वाहतूक केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात अन्न सुरक्षा माणके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रवींद्र भडूरे हे करत आहेत.