नळदुर्ग - श्रावण मासानिमित्‍त नळदुर्ग येथिल रामतिर्थच्‍या श्रीराम मंदिरात आयोजित  शिवपुराण काशीखंड ग्रथ वाचनाच्‍या कार्यक्रमाचे समारोप रविवार दि.13 रोजी होणार आहे. श्रावण महिन्‍यामध्‍ये रामतिर्थ मंदिरात शिवापुराण काशीखंड ग्रंथाचे वाचन करण्‍यात आले. रविवार रोजी ग्रंथ वाचन समाप्‍तीचे कार्यक्रम होणार असुन सकाळी 9 ते 11 वाजण्‍याच्‍या कालावधीत रद्राभिषेक आणि होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानतर महाप्रसादाचे वाटप उपस्थित भक्‍ताना करण्‍यात येणार आहे. तरी याचा लाभ भाविकांनी  घ्‍यावा असे आवाहन राम मंदिर देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष विष्‍णुदास शर्मा महाराज, विश्‍वस्‍त  बलभिम मुळे, बाळासाहेब नकाते यानी केले आहे.    
 
Top