उस्मानाबाद -  जिल्ह्यात 1 जानेवारी 2016 या अर्हता दिनांकावर आधारित मतदान याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे. 
पुनरिक्षणातील टप्पे व कालावधी खालीलप्रमाणे आहेत.  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी गुरुवार,दिनांक 8 ऑक्टोबर,2015. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी  गुरुवार,दि.8 ऑक्टोबर ते शनिवार, दि.07 ऑक्टोबर,2015पर्यंत. मतदार यादी मधील संबंधित भागाचे/सेक्शचे ग्रामसभा/स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे बुधवार,दि.14 ऑक्टोबर,2015. विशेष मोहिमेचे दिनांक रविवार, दिनांक 11 ऑक्टोबर ते रविवार, दि.18 ऑक्टोबर,2015.दावे व हरकती निकालात काढणे सोमवार,दि.30 नोव्हेंबर,2015पर्यंत. डाटाबेसचे अद्यावतीकरण इत्यादी गुरुवार, दि.24 डिसेंबर,2015 पर्यंत. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी शनिवार, दि. 16 जानेवारी,2016 अशी राहील,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

 
Top