अणदूर :- तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील रुग्‍णांना राष्‍ट्रीय चर्मकार महासंघाच्‍या 20व्‍या वर्धापनादिनानिमित्‍त राष्‍ट्रीय चर्मकार संघ युवक आघाडी महासंघाच्‍यावतीने फळाचे वाटप करण्‍यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे, ग्रा.प. सदस्‍या अनुराधा पापडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यतनाळकर, प्रितम पाटील, नितीन कानडे, चर्मकार महासंघाचे युवक जिल्‍हाध्‍यक्ष सोमनाथ बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी संकेत मोहराळे, गणेश घुगे, आशिष राठोड, गंगाधर लंगडे, नितीन सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
 
Top