वाशी :- वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीवर सत्ताधारी पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावून निखील - कांदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाभिमानी पॅनलच्या सौ. शितल सुनिल शिंदे तर उपसरपंचपदी सौ. सत्यभामा संजय कवडे यांची निवड झाली आहे.
वाशी तालुक्यातील बावी येथील ग्रामपंचायतच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलच्या विरोधात या निवडणूकीत प्रथमच निखील कांदे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलने निवडणूक लढविली व या निवडणूकीत स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सत्ताधारी पक्षाला भुईसपाट करुन ग्रामपंचायतची सत्ता हस्तगत केली.
आज या ग्रामपंचायतच्या सरंपच व उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलकडून सरपंचपदासाठी सौ. शितल सुनिल शिंदे तर उपसरपंचपदासाठी सौ. सत्यभामा संजय कवडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच व उपसरपंच पदासाठी सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांचा सहा विरुध्द पाच मतांनी पराभव करुन सरपंचपदी सौ. शितल शिंदे तर उपसरपंचपदी सौ. सत्यभामा कवडे या विजयी झाल्या. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आशालता विक्रम शिंदे, अज्ञानबाई शेषेराव धावारे, दिबंगर सोपान माळी, भिमा मोहन शिंदे यांच्यासह वसंत बापू, धनाजी शिंदे, आप्पा शिंदे, रामेश्वर गळधर, त्रिबंक बप्पा, विष्णू शिंदे, अ‍ॅड. भोंडवे, शिवाजी बप्पा, शंकर शिंदे, बिभिषन शिंदे, संजय शिंदे, रामदास शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पॅनलचे नेते निखील कांदे - पाटील नुतन पदाधिकाNयांचा सत्कार केला.
 
Top