नळदुर्ग - दहिटणा ता. तुळजापूर येथे गेल्या 14 वर्षापासुन एक गाव, एक गणपती, ही संकल्पना यशस्वीपणे राबवुन या मंडळाने राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे. येथिल जय हनुमान तरूण गणेश मंडळाच्या पदाधिकारीमध्ये हिंदुसह मुस्लिम समाजाचे युवक सह
भागी होवुन गणेशोत्सव शांततेत व उत्साहाने साजरा करून एक आदर्श या मंडळाने निर्माण केले.
गणेशोत्सवाचे औचित्य साधुन गावात स्वच्छाता आभियान , व्यसनमुक्ती कार्यक्रम व सांस्कृतीककार्यक्रम घेण्यात आले. शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा घेवुन त्यांच्यातील कला गुणाना प्रोत्साहन दिले आहे. दहिटणा येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहाने गणरायाची प्रतिष्ठापणा करून एक गाव, एक गणपती ,ही संकल्पना यशस्वी करण्यात आली. ही पंरपरा सन 2000 पासुन आजतागायत निरंतर अखडंपणे दहिटणा ग्रामस्थानी जोपासत आहेत. गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धा, बादलीत चेंडु टाकणे, दोरी उडी, स्लो सायकल चालवणे, संगीत खुर्ची, यासह विविध स्पर्धेतील विजेत्याना पारितोषिक प्रमुख पाहुणे पत्रकार शिवाजी नाईक यांच्या हस्ते देण्यात आले.
कु.सादिया अय्याज सय्यद, अहमद सुलेमान शेख , अंकिता बलभिम कदम, मयुरी अविनाश पाटील, चेतन भिम कुंभार, मिनाक्षी पाटील यासह इतर विजेत्याना यावेळी पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रांरभी श्री ची पुजा शिवाजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाच्यावतीने शिवाजी नाईक , रविद्र नाईक यांचे सत्कार करण्यात आले .यावेळी मंडळाचे सल्लागार विजय पाटील, राजेद्र कुंभार, श्रीकांत पाटील, शंकर चव्हाण, रोहित नागरसे, सुनिल भोंडवे, मंडळाचे अध्यक्ष आमोल कुंभार, उपाध्यक्ष रोहित पाटील , सचिव विलास गुडडे , कोषाध्यक्ष ईलाही शेख यांच्यासह कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थि होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार रोहित नागरसे यानी मानले. या गणेश मंडळास नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यानी भेट देवुन मंडळानी राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेतल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.
