नाशिक :- नाशिकात शाही स्‍नान करुन आपल्‍या घराकडे परतणा-या तीन भावकांचा अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. तर अन्‍य चार जण गंभीर जखमी झाले असून त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार सुरु आहे. अपघातातील मयत हे गुजरात राज्‍यातील सिल्‍वासाचे रहिवाशी आहेत.
श्रवण मांगीलाल पारीख (वय 35 वर्षे), गोविंद मांगीलाल पारीख (वय 32), अंबिका श्रवण पारीख (वय 10 वर्षे) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍यांचे नावे असून आयना श्रवण पारीख (वय 7 वर्षे), मंजुदेवी श्रवण पारीख (वय 30), रामदेव पारीख (वय 32) यांच्‍यासह दुचाकीस्‍वार रवींद्र लवाटे (रा. नाशिक) असे चौघेजण जखमी झाले आहेत.  
सिल्वासाला राहणारे पारीख कुटुंबीय दुस-या शाहीस्नानासाठी नाशिकात आले होते. तेथून सोहळा संपन्न झाल्यानंतर घरी परतताना  नाशिक पेठ रस्त्यावरून जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीची टेम्पोला धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर चौघेजण जखमी झाले. नाशिकच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात जखमीवर उपचार चालू आहेत.
 
Top