उस्मानाबाद :- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या माध्यमांचे कौतूक अलीकडच्या काळात दुरापास्त होत आहे. अशावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाने राज्यासमोर एक नवा पायंडा ठेवला आहे. निसर्गाच्या अवकृपेने पिचलेल्या गरीब शेतकरी आणि निराधार कुटूंबियांच्या मनगटाला बळ देण्यासाठी गणेश मंंडळांंना प्रोत्साहित करून पत्रकार संघाने केलेले काम अनेकांसाठी पथदायी आहे. मंडळांच्या सहकार्यातून उत्सव कसा साजरा करावा, याची विधायक दिशा पत्रकार संघाने राज्यासमोर मांडली असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी केले. 
                उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी गतवर्षी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार संघाचे सचिव विशाल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           पुढे बोलताना दुर्गमहर्षी मांडे म्हणाले की, जिल्हा पत्रकार संघाने पारंपारिक प्रथांना फाटा देत वंचितांना आधार देण्याचा केलेला प्रयत्न अनुकरणीय आहे. त्यांच्या संकल्पनेला साथ देत उस्मानाबादमधील प्रायोजकांनी तसेच गणेश मंडळांनी दिलेला प्रतिसाद राज्यातील सर्वांनीच अंगीकारावा एवढा स्तुत्य आहे. मिळालेल्या बक्षीसांची रक्कम पिचलेल्या, दुर्बल आणि निराधारांच्या उभारणीसाठी देणे ही खूप मोठी बाब आहे. गणपती बुध्दीचा देव आहे. त्यांच्या नादी निर्बुद्धांनी लागू नये, असे सांगत त्यांनी थोडक्यात  गणेशोत्सवाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. पत्रकार आणि गणेश मंडळांनी सामाजिक उपक‘म राबवून महाराष्ट्राला गणेशोत्सव कसा साजरा करावा याचा वस्तूपाठ या कार्यक‘मातून घालून दिला असल्याचेही मांडे यांनी नमूद केले. या स्तुत्य उपक‘माची माहिती आपण राज्यभर पोहचविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
         जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यात गणेश मंडळांनी स्वावलंबन गणेशोत्सव साजरा
करावा. लहान मूर्ती बसवाव्यात. ग्रामीण भागात एक गाव, एक गणपती किंवा एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवावी.  दुष्काळी परिस्थितीत गणेश मंडळांनी ‘लहान मूर्ती पावन किर्ती, यावे मंगलमूर्ती’ या बि‘दवाक्याप्रमाणे लहान मूर्ती बसवून दुष्काळग‘स्त शेतकर्‍यांसाठी सामाजिक उपक‘म राबवावेत. जनावरांसाठी चारा द्यावा, सामुदायिक विवाह सोहळा, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरणासारखे उपक‘म राबवावेत. त्यासाठी शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत प्रशासन करेल, असे अभिवचनही त्यांनी दिले.
गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सर्व गणेश मंडळांना आपल्या मिरवणूक देखाव्याचे प्रदर्शन करता येण्यासाठी सर्वांनी कमी वेळेत आपले प्रदर्शन करावे, तसेच वेळेत विसर्जन मिरवणूक पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पत्रकार संघाने राबविलेल्या स्तुत्य उपक‘माचेही त्यांनी कौतूक केले. 
         यावेळी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त करून पत्रकार संघ व गणेश मंडळांना सामाजिक उपक‘म राबविण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. 
          प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांनी केले. दरवर्षी पत्रकार संघाच्यावतीने सातत्यपूर्ण सामाजिक उपक‘म स्पर्धा, शिस्तबध्द गणेश विसर्जन मिरवणूक, गणेश देखावा स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर यंदा पत्रकार संघाच्यावतीने उस्मानाबाद गौरव पुरस्कार हा नव्याने सुरू करण्यात आला आहे. बक्षीस वितरणासाठी प्रायोजकांकडून व पदाधिकार्‍यांकडून यंदा दीड लाखाची रक्कम जमा झाली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून गरीब, निराधार कुटूंबियांना आधार देण्याचा प्रयत्न म्हणून २१ कुटूंबांना प्रत्येकी एक याप्रमाणे शेळी वाटप करण्याचा निर्णय गणेश मंडळाच्या सहकार्याने घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक‘मात पत्रकार संघाच्या विविध स्पर्धांतील परिक्षक प्रा. प्रशांत गुरव, प्रा. आनंद वीर आदी परिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक‘माचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे निमंत्रक अनंत आडसूळ आणि रविंद्र केसकर यांनी केले. तर आभार सरचिटणीस विशाल सोनटक्के यांनी मानले. 

गणेश मंडळांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे : नगराध्यक्ष
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गणेश मंडळांनी रस्त्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करू नये. रस्त्याच्या फक्त २५ टक्के भागापर्यंत गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मंडप उभारावा. त्याचबरोबर ज्या गणेश मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्या गणेश मंडळाचे पदाधिकारी, पालिका पदाधिकारी, प्रशासन यांच्यासमवेत बैठक  घेवून त्यावर तोडगा काढू, असे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नमूद केले. 

 
Top