मंगळवेढा (समाधान फुगारे) :- आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षापासून दामाजी कारखाना हा इतर कारखान्याबरोबर सर्व शेतकर्‍यांना सोबत घेवून एफ.आर.पी प्रमाणे चांगला दर दिला आहे व पूर्वीच्या संचालकाने केलेले कर्ज निम्याने या कर्जाची परतफेड केले असल्याचे मत श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कारखाना स्थलावर संपन्न झाली.यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शशिकांत बुगडे होते.
यावेळी कार्यकारी संचालक अशोक नलवडे,संचालक समाधान आवताडे,अशोक सुरवसे,पांडुरंग चौगुले,धनंजय पाटील,परमेश्वर आवताडे,बळवंत पाटील,हर्षराज बिले,मारुती वाकडे, दादा गरंडे,सचिन नकाते,बाबसो बेलदार,ज्ञानेश्वर खांडेकर, शिवाजी काळुंगे,सुहास पवार,सुरेश कोळेकर,यादाप्पा माळी,दत्तात्रय कांबळे,बाबसो कांबळे,महादेव फराटे आदि संचालक उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला कारखान्याचे संस्थापक स्व.कि.रा.मर्दा व रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी कारखान्याची आर्थिक परस्थिती व उस उत्पादन व साखर अशा विविध प्रकारची माहिती दिली व सभासदांनी मंजुरी दिली.
संचालक धनंजय पाटील यांनी कारखान्याचा वार्षिक आर्थिक लेखा जोखा सभेपुढे विषयाचे वाचन केले यावेळी कारखान्याचे संचालक समाधान आवताडे हे कार्यक्रमात स्टेजवरती न बसता त्यांनी खाली बसून सभेपुढील विषयी ऐकून घेतले यावेळी शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे,प्रा.येताळा भगत ,शशिकांत चव्हाण ,राहुल घुले  यांनी प्रश्न मांडण्यासाठी माइकची मागणी केली असता माइक देण्यात आला नाही.
कारखान्यामधील २८ हजार सभासदांना बोलवण्यात आले नाही , काही ठराविक लोकांना बोलवले असून २०१३-१४ चे मुद्दे पुन्हा पुन्हा या वार्षिक अहवालामध्ये मांडण्यात आले आहेत असा आरोप सिद्धेश्वर हेंबाडे यांनी केला आहे.
लेखी आलेल्या प्रश्नाचे उत्तरे संचालक धनंजय पाटील यांनी  दिली. ही सभा अत्यंत वादळी न होता पोलिस बंदोबस्तामध्ये पार पडली. 
कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर मिसाईल मॅन स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व माजी गृहराज्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 
Top