पांगरी (गणेश गोडसे ) सामाईक विहीरीवरील मोटारीचा फ्यूज काढल्याच्या व सामाईक बोअरचे पाणी हौदात सोड म्हणाल्याच्या किरकोळ कारणावरून कु-हाड,काठी,दगडांनी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना चिखर्डे ता.बार्शी येथील वस्तीजवळ घडली.
   दत्तात्रय उत्रेश्वर भंडारे वय 45,सौदागर भगवान भंडारे वय  55,कल्याण दतात्र्य भंडारे वय 22,नृसिंह विठ्ठल भंडारे वय 30,विठ्ठल भंडारे,सुमन विठ्ठल भंडारे सर्व रा.चिखर्डे अशी मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील जखमीची नांवे असून त्यांच्यावर बार्शीच्या खाजगी जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  दत्तात्रय उत्रेश्वर भंडारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी विठ्ठल भगवान भंडारे,नृसिंह विठ्ठल भंडारे यांनी चुलत बंधु सौदागर भंडारे यांच्या सामाईक बांधाच्या व सामाईक विहीरीवरील पाण्याच्या मोटारीचा फ्यूज काढल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादिस डोक्यात हातावर कु-हाडीने मारून जखमी केले.तसेच जखमी सौदागर भंडारे व कल्याण भंडारे यांनाही शिवीगाळी दमदाटी करून मारहाण केली॰
   विरोधी नृसिंह विठ्ठल भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी दशरथ सौदागर भंडारे यांना सामाईक हौदात पाणी सोडण्यास सांगितल असता आरोपी कल्याण दत्तात्रय भंडारे यांनी चिडून जावून हातात दगड घेऊन फिर्‍यादीच्या डोक्यात व डोळ्यांवर मारून जखमी केले.तसेच दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच सौदागर भंडारे यांनी त्यांच्या आईस ढकळून देऊन जखमी केले.परस्पर विरोधी फिर्यादीवरून पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रवींद्र भडूरे हे करत आहेत.

 
Top