मंगळवेढा (समाधान फुगारे) :- सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची व ऊसाची फारच वाईट आहे. त्यामुळे मागील काळा मध्ये शेतकरी उस घेवून जावा म्हणून कारखानदाराकडे व शेती अधि-यांना भेटत होते पण आता उलट प्रवाह सुरू झाला असून सर्व शेती अधिका-यांनी शेतक-यांच्या घरापर्यंत जावून ऊसाची मागणी करून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे असे आवाहन भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यूनिट ३ लवंगीचे व्हाईस चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले. ते लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यूनिट ३ च्या द्वितीय मोळी पूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल (दादा) सावंत, सिद्धेश्वर अवताडे, जत नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते उमेश सावंत, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संतोष पवार, प्रा. शिवाजी काळुंगे, माजी जि प अध्यक्ष रामचंद्र माने, पांडुरंग ताड, बंडोपंथ जाधव, चंद्रकांत देवकर, बाबूराव मोरे, अप्पासाहेब माने, प्रकाश सुरवसे,युवराज गडदे आदी उपस्थित होते, यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे हस्ते मोळी पूजन करण्यात आले व सत्यनारायन महापूजा श्री अनिल सावंत व त्यांच्या पत्नी शैलजा सावंत यांचे हस्ते करन्यात आले.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की , शेतकर्‍यांच्या उसाला भविष्यात चांगला दर देवू सध्या एफ.आर.पी चा मुदा पूर्ण पणे गाजत असला तरी मागील हंगामा मध्ये या परिसरातील इतर कारखान्या पेक्षा जादा दर दिला असून गेल्या वर्षी 1 हजार 600 रुपये दर देवून ही एफ.आर.पी पेक्षा 100 रुपये जादा दर दिला आहे.
या कार्यक्रमास अनंत बावणे, राजेंद्रकुमार पाटील, सतेज पाटील, भगत साहेब, प्रमोद तोडकर, उमेश पेठकर, कृष्णदेव लोंढे, आंबादास कोरके, शिवाजी चव्हाण ,प्रमोद भोसले, देवानंद पासले, अभिजीत पवार, संजय राठोड, कुंडलिक कदम, इंद्रजीत पवार, सुरेश कुललोळी, अशोक निकम, बंडू पाटील, अनिल खंदारे, शिवाजी चव्हाण, शंकर पाटील,  गोपाल भोसले, विजयकुमार नागणे, राहुल झरे, सिद्धेश्वर गुंड, संतोष अवताडे,नवनाथ चव्हाण  यांच्या सह जत, कर्नाटक, मंगळवेढा, पंढरपूर या भागातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते, प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन तानाजी पवार यांनी केले तर आभार प्रमोद तोडकर यांनी मानले.
 
Top