पारितोषिकांची रक्कम दुष्काळग्रस्‍ताच्‍या मदतीसाठी 
शहरातील गणेश मंडळांचा नवा ‘उस्मानाबाद पॅटर्न’
उस्मानाबाद -:  जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्या गणेश मंडळांनी यंदा नवा उस्मानाबाद पॅटर्न राज्यातील गणेश मंडळांसमोर ठेवला आहे. विविध स्पर्धांपोटी मिळालेल्या पारितोषिकांच्या दीड लाख रूपये रकमेतून २१ दुष्काळग‘स्त निराधार, वंचित आणि दुर्बल महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. दुष्काळग‘स्तांच्या मदतीसाठी पारितोषिकांची रक्कम उत्स्फूर्तपणे देऊ करणार्‍या गणेश मंडळांचा हा नवा पॅटर्न राज्याला पथदायी ठरेल, असाच आहे. 
         उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मागील १२ वर्षांपासून गणेशोत्सव काळात विविध स्पधार्ंचे आयोजन केले जाते. यात सातत्यपूर्ण सामाजिक उपक‘म स्पर्धा, उत्कृष्ट आरास स्पर्धा आणि शिस्तबध्द गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धांचे आयोजन केले जाते. गतवर्षी झालेल्या स्पर्धांतील विजेत्या मंडळांनी पारितोषिकापोटी मिळालेली दीड लाख रूपयांची रक्कम यंदा दुष्काळग‘स्तांच्या मदतीसाठी खर्च केली आहे. पत्रकार संघाकडे ही रक्कम जमा करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यातून २१ दुष्काळग‘स्त कुटूंबियांना शेळी वाटपाचा कार्यक‘म मान्यवरांच्या हस्ते शहरातील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी मोठ्या भावुक वातावरणात पार पडला. यावेळी गणेश मंडळांनी दिलेल्या पारितोषिकांच्या रकमेतून तसेच अनिल केसकर, अमित सोमवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. सुरेश करंजकर, डॉ. दत्तात्रय खुने, संजय मैत्रेवार आणि कैलास पाटील यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून कुसूम भैरू वाघमारे, मनीषा बाबुराव जाधव, सुनीता किसन वाडकर, सिताबाई दामू बनसोडे, सुवर्णा संपत केंचे, संपताबाई पांडूरंग शिंदे, मधुबाई माणिक साळुंके, रेखा कैलास फडके, विमलबाई विष्णू उधारे, शारदा सुधीर वाघमारे, शहाबाई विश्‍वनाथ धनके,भागीरथीबाई सखाराम क्षीरसागर, आशाबाई बाळासाहेब जानराव, मंगलबाई चनप्पा पवार,रूपाली हिराजी भोसले, मोहरबाई भानुदास वाघमारे, सुलताना कमाल सय्यद, चंद्रभागाबाई प्रभु धावारे, शीला दत्ता दावणे, वैशाली बाळासाहेब सोनवणे, केवळबाई भागवत जानराव या २१ महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. 

 
Top