उस्मानाबाद :- जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूक स्पर्धेत विजय चौक तरूण गणेश मंडळ आणि त्रिमुर्ती गणेश मंडळाने, देखावा स्पर्धेत सम्राट आणि बालहनुमान गणेश मंडळाने तर सातत्यपूर्ण सामाजिक उपक‘मात यंदा विजय चौक तरूण गणेश मंडळाने आपला ठसा उमटविला आहे. गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे रविवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात वितरण करण्यात आले. यावेळी गणेश मंडळांनी गणपती बप्पा मोरयाचा एकच जयघोष केला.
पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिस्तबध्द श्री. गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेत हिराबाई नंदकिशोर मंत्री यांच्या स्मरणार्थ संजय मंत्री यांच्यावतीने प्रायोजित करण्यात आलेले १० हजार रूपयांचे पारितोषिक त्रिमूर्ती गणेश मंडळ, विजय चौक तरूण गणेश मंडळ, विजय चौक, उस्मानाबाद यांना विभागून प्रदान करण्यात आले. दुसर्या क‘मांकाचे डॉ. सचिन देशमुख यांनी प्रायोजित केलेले ७ हजार रूपयांचे पारितोषिक सिंहासनाधीश्वर गणेश मंडळ, रामनगर उस्मानाबाद आणि आदर्श गणेश मंडळ, श्रीपतराव भोसले हायस्कूल यांना विभागून देण्यात आले. तर सुभाष पोतदार यांच्या स्मरणार्थ महेश पोतदार यांनी प्रायोजित केलेल्या पाच हजार रूपयांच्या तिसर्या क‘मांकाचे मानकरी शिवओडियाराज तरूण गणेश मंडळ आणि राजे संभाजी गणेश मंडळ हे ठरले.
याच स्पर्धेत एकूण चार उत्तेजनार्थ पारितोषिके देवून मंडळांना सन्मानीत करण्यात आले. त्याचे स्वरूप तीन हजार रूपये व सन्मानचिन्ह, असे होते. ऍड. राघवेंद्र बोधले यांनी धनंजय बोधले यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केलेले उत्तेजनार्थ पारितोषिक बालहनुमान गणेश मंडळाला, शंकरराव ढवळे यांच्या स्मरणार्थ राज ढवळे यांनी प्रायोजित केलेले पारितोषिक श्रीकृष्ण गणेश मंडळाला, डॉ. अभिजीत बागल यांनी तुळजाई चाईल्ड केअर युनिटच्यावतीने प्रायोजित केलेले उत्तेजनार्थ पारितोषिक शिवराज्य गणेश मंडळास तर मुकूंदराव वीर यांच्या स्मरणार्थ डॉ. धीरज वीर यांनी प्रायोजित केलेले उत्तेजनार्थ पारितोषिक आदर्श गणेश मंडळ, इंगळे ग‘ी यांना प्रदान करण्यात आले.
गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट आरास स्पर्धा घेण्यात आली होती. यात दत्तात्रय शेटे यांच्या स्मरणार्थ अक्षय मेटल्सचे संतोष शेटे यांनी १० हजार रूपयांचे पहिले पारितोषिक प्रायोजित केले होते. सम‘ाट गणेश मंडळ सावरकर चौक आणि बालहनुमान गणेश मंडळ गवळी ग‘ी यांनी हे पारितोषिक विभागून पटकावले. दुसर्या क‘मांकाचे विठ्ठलराव दापके-देशमुख यांच्या स्मरणार्थ डॉ. दिग्गज दापके यांनी प्रायोजित केलेले ७ हजार रूपयांचे पारितोषिक शिवाजी तरूण गणेश मंडळ आणि श्रीकृष्ण गणेश मंडळ यांना विभागून देण्यात आले. तिसर्या क‘मांकाच्या बक्षीसाचे प्रायोजकत्व विश्वनाथ जाधव यांच्या स्मरणार्थ शरद जाधव यांनी स्वीकारले होते. हे पारितोषिक आदर्शनगरमधील आदर्श महिला गणेश मंडळाने पटकाविले. तर अयोध्या पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत पाटील यांनी आणि पी. आर. ऍटोच्यावतीने पी. आर. काळे यांनी प्रायोजित केलेले उत्तेजनार्थ तीन हजार रूपयांचे पारितोषिक अनुक‘मे सन्मीत्र गणेश मंडळ हनुमान चौक आणि अचानक तरूण गणेश मंडळ काळा मारूती चौक यांना विभागून देण्यात आले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने सातत्यपूर्ण सामाजिक उपक‘म राबविणार्या गणेश मंडळासाठी २५ हजार रूपयांची रोख पारितोषिके प्रायोजित केली होती. प्रथम पारितोषिक विजय चौक तरूण गणेश मंडळ आणि द्वितीय माऊली तरूण गणेश मंडळ, तृतीय राजे संभाजी तरूण गणेश मंडळ तर उत्तेजनार्थ तांबरी गणेश मंडळ तांबरीचा राजा यांनी पटकाविले. या मंडळांना अनुक‘मे १० हजार, ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रूपये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व पारितोषिकप्राप्त मंडळांनी ही रक्कम दुष्काळग‘स्त शेतकर्यांच्या मदतीसाठी यावेळी बहाल केली. त्यातून २१ कुटूंबियांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले.
