पांगरी -: मोबाईलवर फोन केल्याच्या कारणावरून चिडून एकास लोखंडी कत्तीने मारहाण करून जखमी केल्याची घटना चुंब (ता. बार्शी) येथे घडली.
अमोल तुकाराम जाधवर (वय 24, रा.चुंब) असे कत्तीहल्ल्यात जखमी झालेल्याचे नांव असून त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विरभद्र महादेव ढाकने असे जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नांव आहे.
अमोल जाधवर यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते घराकडे जात असताना ढाकने यांनी त्यांना गाठून तू माझ्या मुलीच्या मोबाईलवर फोन का करतोस असे म्हणून शिवीगाळी,दमदाटी करत लाथा बुक्क्यांनी व लोखंडी कत्तीने मारहाण करून जखमी केले.पांगरी पोलिसात मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.
