पंढरपूर - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पत्रकार भवन व गृहनिर्माणचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

                              डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सं
स्थेतर्फे पत्रकार अभिराज उबाळे यांनी पत्रकार पुरस्कार सोहळा आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्व. पांडुरंग (तात्या) घळसासी स्मृती विकास पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत साबळे व विजयकुमार सोनवले, पत्रकार स्व. अमित ओव्हाळ स्मृती युवा प्रतिभा पुरस्कार समाधान फुगारे व सम्मेद शहा यांना प्रदान करण्यात आला.
  माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूरच्या पत्रकारांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी पंढरपूर पत्रकार भवनसाठी माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी खादी ग्रामोद्योगची जागा दिली आहे. काही कारणास्तव हे काम रखडले आहे; मात्र यापुढे या कामात लक्ष घालून पूर्ण करण्यात येईल, असे सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले.
            यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आ. दत्तात्रय सावंत, पत्रकार सुधाकर काश्यप, जि.प. सदस्य धवलसिंह मोहिते-पाटील, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे, सुनील उंबरे, हरिभाऊ प्रक्षाळे, नवनाथ पोरे, अभय जोशी, संजय वाईकर, प्रशांत आराध्ये, संकेत कुलकर्णी, सचिन कसबे, नितीन शिंदे, शरद कारटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
फोटो ओळी - विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रीकांत साबळे, विजयकुमार सोनवले, समाधान फुगारे व सम्मेद शहा यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा. डॉ. सुनील गायकवाड, सुधाकर काश्यप, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अभिराज उबाळे, जि.प. सदस्य धवलसिंह मोहिते पाटील आदी

 
Top