उस्मानाबाद :- बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील विजय गणेश मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबीर घेण्यात आले. गणेश मंडळाच्या रक्तदान शिबीर आयोजनाचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे.
रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी गावच्या सरपंच लताताई मधुकर रसाळ, उपसरपंच बालाजी गावडे, पांडूरंग पवार, बालाजी शिंदे, अनिल बागल, सुधीर गायकवाड, रामभाऊ मोटे, गोविंद नळेगावकर, नवनाथ सिरसट, अजय रोहिटे, बाळासाहेब लोहार आदी उपस्थित होते. या शिबीरात २० जणांनी रक्तदान केले. गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतूक होत आहे.