उस्मानाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह. उस्मानाबाद येथे बार्टी पुणे यांच्या उस्मानाबाद जिल्हयातील सर्व समतदुतांना आमंत्रित करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृह अधिक्षक नाईकनवरे बप्पा अर्जुन हे होते. त्यांनी सर्व समतादुतांचे पुष्प देवून स्वागत करुन प्रास्ताविक केले. या कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांमध्ये जातीय सखोला, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक बांधीलकी, बंधुता, समता, न्याय या मुल्यांची रुजवण व्हावी तथा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होऊन आदर्श समाज निर्मितीचा त्यांनी घटक व्हावे, यासाठी व्याख्यान, गाणी, पथनाटय इत्यादी उपक्रमाच्या सहाय्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना समतादुतांनी अत्यंत बहुमोल असे मार्गदर्शन केले. या समतादुतामध्ये मोटे गणेश अंकुश(भुम-परंडा), शिंदे शशिकांत बाबासाहेब(वाशी), नरवडे रमेश नानासाहेब (उस्मानाबाद), रणदिवे अर्चना आण्णासाहेब ( कळंब ), फुलसुंदर नागनाथ बाबुराव ( लोहारा ), बनसोडे अक्षता प्रकाश (उस्मानाबाद ) आणि गायकवाड कूलदिप नवनाथ (कळंब) यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास वस्तिगृहाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते व विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आभार कु.याशोदास गौतम जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला असल्याचेही अधिक्षक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (मा.व.) मुलांचे, शासकीय वसतीगृह, उस्मानाबाद यांनी पत्रकात नमूद केले आहे.