उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील वरवंठी ग्रामपंचायतवर सरपंच व उपसरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यामुळे या ग्रामपंचायतवर शिवसेना भगवा फडकला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत वरवंठी ग्रामपंचायतच्या
सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा शिवसेनेच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. आज या ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी स्वाती शहाजी देशमुख तर उपसरपंच पदासाठी सौ. अर्चना विश्वनाथ कांबळे या दोघींचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती शहाजी देशमुख, उपसरपंचपदी सौ. अर्चना विश्वनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
ही निवड जाहीर होताच ग्रामपंचायतसमोर जमलेल्या गावातील नागरीक व शिवसैनिकांनी गुलालाची उधळन करीत हा विजयी जल्लोश साजरा केला. यानंतर शिवसेनेच्या वडगाव गटाच्या जि.प. सदस्या सुषमा अरुण देशमुख यांच्या हस्ते नुतन सरपंच स्वाती देशमुख व नुतन उपसरपंच अर्चना कांबळे यांच्यासह सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नुतन ग्रामपंचायत सदस्य रविप्रसाद देशमुख, कमलाकर सरवदे, संजय सगर, अलका सरपाळे, सखुबाई पवार यांच्यासह रामभाऊ देशमुख, शहाजी देशमुख, कालिदास देडे, संगप्पा बेद्रे, महेश बेद्रे, उमाकांत पाटील, राजेंद्र सरवदे, रवी सरवदे, विठ्ठल कांबळे आदीसह गावातील नागरीक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या नुतन सरपंच व उपसरपंच यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
