संध्याकाळाच्या हेडलाईन्स.... दि. 1 ऑक्टोबर 2015
1. आयकर रिटर्न भरण्याची मुदत आता ३१ ऑक्टोबर पर्यंत, कलम ४४ एबी अंतर्गत सरकारचा निर्णय
2. विना-अनुदानित सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्त, 1 ऑक्टोंबरपासून स्वस्तात मिळणार सिलिंडर
3. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४,६४,६५१ शौचालयांचे काम पूर्ण, ११,८०, ४५४ शौचालयांचे काम अद्याप सुरु - व्यंकय्या नायडू
4. रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून देशभरात लागू, गाड्यांची नवी वेळ आणि प्लॅटफॉर्म नं. १३९ या हेल्पलाइन नं. वर कळेल
5. भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत 4 जी जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी, जाहिरातीमुळं दिशाभूल आणि चॅप्टर 1.4चं उल्लंघनाचा ठपका
6. रेआल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने रेआल क्लबकडून सर्वाधिक गोल झळकवणार्या राऊलच्या विक्रमाशी केली बरोबरी
7. सुरक्षतेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय
8. फेसबुकची आपल्या यूजर्ससाठी एक नवी भेट, आता 'व्हिडिओ'ही होणार तुमचा फेसबुक प्रोफाईल पिक्चर!
9. 'झी मराठी अवॉर्ड्स २०१५' ३ ऑक्टोबरला मतदान, निवडा आपली आवडती मालिका
10. यवतमाळ - कर्ज आणि आजाराला कंटाळून गुराख्याची आत्महत्या, स्मशानातील झाडावर घेतला गळफास
* संकलन - अमोल फुलारी