संध्याकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन्स - गुरुवार १ ऑक्टोबर २०१५
✨ पुण्यातील ६५ टक्के ज्येष्ठ मधुमेही, तर ३५टक्के ज्येष्ठांमध्ये मधुमेहाची लक्षणे, डॉ. अजित गोलविलकर, डॉ.अवंती गोलविलकर यांची माहिती
✨ मुंबई: लालबाग तरुणीला मारहाण प्रकरण पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सादर केला अहवाल
✨ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या काळात सनातनवर बंदी का आणली नाही, खडसेंचा सवाल
✨ ठोस पुरावे मिळाले तर सनातनवर बंदी घालू, मात्र कोर्टात टिकतील असे पुरावे पाहिजे: एकनाथ खडसे
✨ यूपीतले मंत्री गोहत्येचं समर्थन करत असल्याचा आदित्यनाथ यांचा आरोप (टीव्ही रिपोर्ट)
✨ औरंगाबादमध्ये वाहतुकदारांचा चक्का जाम सुरु, संमिश्र प्रतिसाद
✨ वेळीच लक्ष न दिल्यास भारताचे अफगाणिस्तान होण्यास वेऴ लागणार नाही, माझ्यावरही जे. बी. आठवले यांनी १९८९ मध्ये संमोहनाचा प्रयोग केला होता - श्याम मानव
✨ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, मुसळधार पावसामुळे कणकवलीजवळील वागदे येथे चार झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत
✨ स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४,६४,६५१ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून ११,८०, ४५४ शौचालयांचे काम अद्याप सुरु आहे - व्यंकय्या नायडू
✨ अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील गेवराई गावात ग्रामसभा सुरु असताना गोळीबार.
✨ आम्ही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिका-यांशी आज चर्चा केली असून येत्या मंगळवारी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार - विकास उर्स, एफटीआयआय विद्यार्थी
✨ जंगलाराजचे निर्माता दिग्दर्शक तेच आहेत, अभिनेता बदलून चरित्र बदलता येणार नाही - जेटली
✨ गेल्या ६८ वर्षांत काँग्रेस, राजद व जदयूच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते, या प्रदीर्घ कालावधीत राज्याचे पूर्ण चित्रच बदलता येते - अरुण जेटली
✨ICC रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ चौथ्या स्थानावर
✨ सुरक्षतेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
----------------------
✏ वृतसंकलन-भाऊ वलेकर